सिद्धकला भजनी मंडळ व श्री दत्त प्रसादिक मंडळाचे आयोजन
गुहागर, दि. 24 : शहरातील सिद्धकला भजनी मंडळ वरचापाट आणि श्री दत्त प्रसादिक मंडळ वरचापाट यांच्यातर्फे गुंतवणूक मार्गदर्शन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 ते 1 यावेळात दत्तमंदिर, वरचापाट गुहागर याठिकाणी हे सत्र होणार आहे. Investment seminar at Datta Mandir

सिद्धकला भजनी मंडळाने यापूर्वी महाआरोग्य अभियान आयोजित केले होते. दत्तमंदिरात वरचापाट येथे गुंतवणूक या विषयावर श्री. प्रसाद देशपांडे यांचे चर्चासत्र आयोजित केले आहे. यामध्ये लहान मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक, मासिक प्राप्ती योजना, सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट, भविष्यातील दायित्वासाठी योजना, निवृत्तीनंतरचे प्लॅनिंग यावर मार्गदर्शन प्रसाद देशपांडे करणार आहेत. Investment seminar at Datta Mandir

तरी या चर्चासत्रासाठी आर्वजून उपस्थित रहावे, असे आवाहन सिद्धकला भजनी मंडळ वरचापाट आणि श्री दत्त प्रसादिक मंडळ वरचापाट यांच्यातर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमाबाबत अधिक माहितीसाठी श्री. मंगेश शेटे 9307165660, श्री. योगेश साखरकर 9405066523, श्री. लतिश कचरेकर 7447368797, श्री. दर्शन देवकर 9689068416 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. Investment seminar at Datta Mandir
