शिंजो आबे यांचं टोपणनाव ‘द प्रिंस’ आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ते नातू होय. 1993 ला ते पहिल्यांदा जपानच्या संसदेचे सदस्य म्हणून विजयी झाले. 2005 साली त्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाला. त्यावेळी जुनिचिरो कोइझुमी हे पंतप्रधान होते. 2006 साली शिंजो आबे पहिल्यांदा जपानचे पंतप्रधान झाले. महायुद्धानंतर जपानमध्ये झालेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद झाली. 2006 ते 2007 असा एक वर्ष, नंतर 2012 ते 2020 पर्यंत ते पंतप्रधान झाले. Introduction to Shinzo Abe
शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले नेते आहेत. 2020 मध्ये आरोग्याच्या कारणावरून त्यांनी पंतप्रधानपद सोडलं. त्यांच्यानंतर योशिहिदे सुगा यांनी जपानच्या पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली. 2012 सालापासून ते आतापर्यंत शिंजो आबे यांनी 6 निवडणुकांमध्ये विजय मिळवला. यात 3 कनिष्ठ तर 3 वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुका होत्या. मात्र, त्यांच्या यशाचं एक मोठं कारण जपानमधील दुबळा आणि कमकुवत विरोधी पक्ष असल्याचं मानलं जातं. Introduction to Shinzo Abe
आबे यांनी टप्प्याटप्प्याने आणि वाढत जाणाऱ्या सुधारणांच्या माध्यमातून यश संपादन केलं. संरक्षण धोरणाबाबत आबे यांच्या टप्प्याटप्प्याने काम करण्याच्या दृष्टिकोनाचे परिणाम अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये दिसून आले. यात 2013 साली स्थापना करण्यात आलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचाही समावेश आहे. 2014 साली नवा गोपनीयता कायदा मंजूर करणं आणि जपानच्या सुरक्षा दलांना सामूहिक सुरक्षा मोहिमांमध्ये भाग घेण्याची परवानगी देणे, यासारख्या तरतुदी त्यात आहे. Introduction to Shinzo Abe
आबे यांच्या कार्यकाळात संरक्षण क्षेत्रावरच्या खर्चात जवळपास 13 टकक्क्यांची वाढ झाली. त्यांनी संरक्षणविषयक अधिक लवचिक धोरणं तयार केली. सैन्यासाठी अत्याधुनिक आणि महागडे सैन्य हार्डवेअरसह F-35 लढाऊ विमानं खरेदी केली. जपानच्या प्रादेशिक क्षेपणास्त्र क्षमता वाढवण्यास सक्षम तंत्रज्ञानाचीही भर टाकली. आबे यांनी आपल्या कार्यकाळात ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशीप (TPP-11) मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी 2019 साली युरोपीय महासंघासोबत एक यशस्वी व्यापारी करार केला, तर 2018 साली चीनसोबत अनेक आर्थिक आणि विकास करारांवर चर्चा केली. Introduction to Shinzo Abe
दोन बेटांच्या मालकीवरून चीन आणि जपान यांच्यात वाद आहे. शिवाय, चीनकडून असणाऱ्या धोक्याचीही जपानला पूरेपूर कल्पना आहे. असं असूनही शिंजो आबे यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत जपानचे व्यापारी सहयोगाचे मार्ग बंद होऊ दिले नाही. आबे यांच्या विकासवादानेच देशांतर्गत आर्थिक व्यवस्थापनासाठी वित्तीय, मौद्रिक आणि रचनात्मक धोरणांमध्ये नवबदलाची परवानगी देणारा दृष्टिकोन अधोरेखित केला. Introduction to Shinzo Abe