• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मयुरेश माने आंतरराज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

by Mayuresh Patnakar
October 14, 2022
in Guhagar
51 1
1
Interstate Model Teacher Award to Mane
100
SHARES
287
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 :  नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रेजी) बेळगाव हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव (NATIONAL RURAL DEVELOPMENT FOUDATION (REG) BELGAVI HEALTH AND NATURE DEVELOPMENT SOCIETY BELAGAVI) या संस्थेकडून आंतरराज्य आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराने चिपळूण तालुक्यातील रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु. या प्रशालेतील  सहा. शिक्षक मयुरेश विश्वास माने यांचा गौरव करण्यात आला. शनिवार दि.०८.१०.२०२२ रोजी धर्मनाथ नगर, धर्मनाथ सर्कल, अशोक नगर गँगवाडी बेळगाव याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला. Interstate Model Teacher Award to Mane

यावेळी कर्नाटक, महाराष्ट्र, आणि गोवा राज्यातील शिक्षण अधिकारी, राजकीय नेते, यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. या संस्थेचे पुरस्कार वितरण करण्याचे तिसरे वर्ष असून यावर्षी एकूण 150 व्यक्तींचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. Interstate Model Teacher Award to Mane

मयुरेश विश्वास माने हे सध्या  चिपळूण तालुक्यातील रत्नाकर शिक्षण संस्था दहिवली बु.|| संस्थेच्या रत्नसागर इंग्लिश स्कूल दहिवली बु. या प्रशालेत २००९ पासून सहा. शिक्षक म्हणून काम करत आहेत. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रेजी) बेळगाव हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव (NATIONAL RURAL DEVELOPMENT FOUDATION (REG) BELGAVI HEALTH AND NATURE DEVELOPMENT SOCIETY BELAGAVI) ही संस्था कर्नाटक, महाराष्ट्र, आणि गोवा राज्यातील उल्लेखनीय व्यक्तींच्या कामाची दखल घेवून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रातील कामासाठी गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले जाते. सन्मान चिन्ह, अभिनंदन पत्र, सन्मान पत्र, म्हैसूर फेटा, चंदनाचा हार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. Interstate Model Teacher Award to Mane

Interstate Model Teacher Award to Mane
सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर

उपक्रमशील शिक्षक मयुरेश माने यांना मागील महिन्यात MIE EXPERT 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मानेसर हे शाळेत व समाजातील विविध उपक्रम राबवत असतात. आणि सक्रीय सहभाग नोंदवत असतात. मागील शैक्षणिक वर्षात त्यांनी परमजीत धिल्लोन आणि भगवंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या RISE UP 4 EWASTE या ई- कचरा बाबत प्रकल्पाचा जगात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच ते राज्यभरात उत्तम तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित आहे. त्याचप्रमाणे ते कवी म्हणूनही परिचित आहेत. त्यांचा एक पाऊस मनातला हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. लवकरच त्यांचा हिंदी कवितासंग्रह प्रकाशित होणार आहे. म्हणूनच त्यांनी आजवर केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आंतरराज्य आदर्श शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री.माने यांचे संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे. Interstate Model Teacher Award to Mane

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInterstate Model Teacher Award to ManeLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share40SendTweet25
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.