कालिदास विश्वविद्यालय व गोगटे महाविद्यालयातर्फे आयोजन
रत्नागिरी, ता.13 : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धर्म, धर्मशास्त्र व संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या परिषदेकरिता सिद्धांत नॉलेज फाउंडेशन, संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान (मुंबई) यांचे सहकार्य लाभले आहे. येत्या १७ व १८ ऑगस्टला गोगटे महाविद्यालयात परिषद होणार आहे. International conference at Ratnagiri


पाच कुलगुरूंचा सहभाग
भारतातील तसेच भारताबाहेरील विद्वान मंडळींच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या परीषदेमध्ये एकूण पाच विद्यापीठांच्या मा. कुलगुरूंचा सहभाग असणार आहे. यामध्ये विविध विषयांवर शोधपत्रे प्रस्तुत केली जाणार आहेत. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या धर्मकोशाचे तसेच धर्मविषयक विविध ग्रंथांचे प्रकाशनही यावेळी केले जाणार आहे. संपूर्ण भारतातून विविध विश्वविद्यालयचे अध्यापक, शोध छात्र या परिषदेत सहभागी होणार आहेत. International conference at Ratnagiri
ग्रंथप्रदर्शन
याबरोबरच डॉ. पां. वा. काणे यांनी केलेले ग्रंथ लेखन कार्य एशियाटिक सोसायटी बॉम्बे आणि भांडारकर ओरीएंटल रिसर्च इंस्टीट्युट या दोन प्रमुख संस्थांद्वारे प्रकाशित केले गेले. त्यापैकी भांडारकर ओरीएंटल रिसर्च इंस्टीट्युटद्वारे डॉ. काणे यांच्या दुर्मिळ साहित्यकृतींचे प्रदर्शन गोगटे महाविद्यालयाच्या परिसरात उपस्थितांसाठी व स्थानिकांसाठी खुले असणार आहे. International conference at Ratnagiri

