पण खऱ्याखूऱ्या दादोजींचे काय
Guhagar news : “खोटे रेटून बोलले की ते खरे वाटू लागते आणि जेव्हा ते इतिहासाच्या स्वरूपात समाजासमोर येते तेव्हा खऱ्या अर्थाने समाजाची दुर्गती सुरु होते ” याचे उत्तम उदाहरण हे नुकतेच बघायला मिळाले ते म्हणजे‘ ‘बुद्धिजीवी आणि इतिहासकार’ दिलीप मंडल यांच्या ‘काल्पनिक पात्र” फातिमा शेख’ यांच्यावरून. दिलीप मंडल यांनी “मिम” विषयी असलेल्या प्रेमामुळे, त्यांनी एक ‘फातिमा शेख – भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका आणि समाजसुधारक’ असे नवीन काल्पनिक पात्र तयार केले. धक्कादायक म्हणजे, ही कथा समाजासमोर इतिहासाच्या स्वरूपात पोहोचली, इतकेच नव्हे तर २०२२ मध्ये गुगलनेही या कथेला डूडलच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले. Intellectuals and historians
परंतु नुकतेच या कथेमागील सत्य उजेडात आले, ज्यामुळे इतिहासाची तोडमोड करणाऱ्या तथाकथित ‘लेफ्टिस्ट इतिहासकारांची सिस्टम’ उघड झाली. एका बाजूला अशा काल्पनिक पात्रांची निर्मिती करण्यात आली, तर दुसऱ्या बाजूला दादोजी कोंडदेव जे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु होते, त्यांच्या ऐतिहासिक अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करून केवळ त्यांच्या ‘जातीमुळे’ त्यांना काल्पनिक ठरवले गेले. Intellectuals and historians
भारतात महिलांच्या शिक्षणाचा प्रसार करणारी पहिली मुस्लिम महिला ही फातिमा शेख होती, असा दावा गेली काही वर्षे केला जात होता. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत सत्यशोधक समाजात त्या सक्रिय सहभागी होत्या आणि पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका होत्या, असाही दावा करण्यात येत आहे. अगदी या फातिमा शेखची जयंतीही साजरी केली जात होती. विकिपीडियावर फातिमा शेखच्या नावाने एक पात्र तयार केले गेले, ज्यावर गुगलने ९ जानेवारी २०२२ ला ‘डूडल’द्वारे त्यांची १९१ वी जयंती देखील साजरी केली. परंतु काल ते सगळे बनावट असल्याची कबुली दिलीप मंडल यांनी दिली. Intellectuals and historians
फातिमा शेख नावाचा पहिला उल्लेख हा २०१९ ते २०२० झाला. त्या आधी ‘गूगल’वर या तथाकथित ‘भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिके’ बद्दल कुठल्याच प्रकारची माहिती उपलब्ध नव्हती. मंडल यांनी २०१९-२०२० मध्ये काही लेख लिहले होते, त्यामध्ये फातिमा शेखचा उल्लेख केला गेला होता. त्या नंतर सगळे ‘सेक्युलर सिस्टिम’ या “काल्पनिक पात्राला’ सत्यात उतरवण्यासाठी एकत्रित झाले. अशाप्रकारे खोटे बोलून इतिहास लिहला गेला की शेवटी फातिमा शेख हे काल्पनिक पात्र खऱ्या मध्ये उतरले आणि बघता-बघता फातिमा शेख यांचे काल्पनिक छायाचित्रदेखील उभे राहिले. Intellectuals and historians
इथे ज्याप्रकारे एका काल्पनिक पात्राला सत्यात उतरवण्यासाठी एक प्रणाली (सिस्टिम) कार्यरत केली गेली होती, त्याचप्रमाणे काही वर्षांपूर्वी एका ऐतिहासिक व्यक्तीचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी देखील या सारखीच एक “डावी” प्रणाली उभारली गेली होती. ती व्यक्ती होते “दादोजी कोंडदेव”. दादोजी कोंडदेवांचा संदर्भ अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आढळतो त्यांचा उल्लेख शिवभारतमध्ये सुद्धा करण्यात आला होता. तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांनुसार दादोजी कोंडदेव हे शहाजी राजेंच्या विश्वासातले आणि कर्तबगार व्यक्ती होते. Intellectuals and historians


निजामशाहीतून आदिलशाहीत प्रवेश केल्यानंतर आदिलशहाने पुणे परगणा शहाजीराजेंनां बहाल केला. पुढे शहाजीराजेंनां कर्नाटकातील जहागीरी मिळाल्यामुळे त्यांनी आपला मुक्काम पहिल्यांदा कंपली आणि नंतर बंगळुरास हलवला. यावेळी त्यांनी पुणे जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी आपला मुतालिक म्हणून दादोजी कोंडदेवाची नेमणूक केली होती. शिवाजी महाराज पुण्यात आल्यानंतर इथली घडी व्यवस्थित बसवण्यासाठी त्यांना दादोजी कोंडदेव यांची मदत झाली. इ.स. १६३३, ३९, ४४, ४५ व ४६ मध्ये लिहिलेल्या मोजक्याच समकालीन पत्रातून दादोजींचा उल्लेख येतो. Intellectuals and historians
दादोजी कोंडदेव, एक कुशल प्रशासक आणि कायदेतज्ज्ञ म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या ओळखले जातात. त्यांनी कार्यक्षम प्रशासन व्यवस्था आणि कायदेशीर चौकटी स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता जरी कुठे शिवभारतमध्ये दादाजी कोंडदेव याना “गुरु” अशी उपाधी दिली नसेल तरी बाल शिवाजी हे दादाजी कोंडदेव यांच्या देखरेखीखाली वाढले याची नोंद अनेक साहित्यिक स्रोतांद्वारे आणि लेखी पुराव्यामध्ये आढळून येते. Intellectuals and historians
‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक असल्याचं म्हणत शिवाजी महाराजांनी अनेक गोष्टींबाबतचे धडे दादोजींकडून घेतले असल्याचे लिहिले आहे. पुरंदरेच नाही, तर शेजवलकरांसारख्या इतिहासकारांसह स्वत: जयसिंग पवार यांनीही ४० वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं लिहिलं होतं. Intellectuals and historians
सत्येन सुभाष वेलणकर या लेखकानुसार,”दादोजी कोंडदेवांनी केले असेल ते रास्तच असेल असा भरवसा खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना देखील वाटत असे दिसते. मावळांचा सुभेदार माहादाजी सामराज याने कर्यात मावळ तरफेचा हवालदार माहादाजी नरस प्रभू याला पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी माहादाजी सामराज याला १२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर १६७५ दरम्यान पाठविलेले एक पत्र उद्धृत केले आहे. त्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द, ” दादाजी कोंडदेऊ चालत आले असेल ते खरे” म्हणजे “दादाजी कोंडदेवांच्या कारकिर्दीत चालत आले असेल ते खरे” असे आहेत. कृष्णराव अर्जुन केळुस्कर, जे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले यांचे अनुयायी होते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरुस्थानी होते, त्यांनी स्वतःच्या पुस्तकात केलेला उल्लेख पहा. Intellectuals and historians