जिल्हा शल्यचिकित्सक, दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक
रत्नागिरी, ता. 22 : जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना व क्लिनिकल पॅथॉलॉजी लॅब यांनी महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारित) महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, १४ जानेवारी २०२१ अनुसूची २ नुसार पुढील आजाराचा रुग्ण आढळून आल्यास/दाखल आल्यास त्याची परिपूर्ण माहिती कळविणे आवश्यक आहे. अनुसूची ३ नुसार शुश्रूषागृहात दरपत्रक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. Instructions for private medical practitioners
कॉलेरा (पटकी), प्लेग, घटसर्प, नवजात बालकांचा धनुर्वात, अॅक्युट प्लॅसीड पॅरालेसीस, जॅपनीस इप्सेफलायटिस, डेंग्यू, संसर्गजन्य कावीळ (इनफेक्टिव्ह हिपॅटिटीस), गॅस्ट्रएंटरायटीस, एच. आय. व्ही तपासणी रुग्ण संख्या, नकारात्मक रुग्णांची संख्या व सर्वसाधारण गरोदर माता मासिक तपासणी संख्या (एचआयव्ही), लेप्टोस्पायरोसीस, क्षयरोग (टीबी), गोवर, मलेरिया, चिकन गुनिया, गर्भाच्या लिंगासह एकूण गर्भपाताची संख्या (१६ ते २० आठवडयातील वैद्यकीय गर्भपात असल्यास), स्वाईन फ्ल्यू (एच १ एन १ इन्फूएंझा) शासन अधिसूचित करेल असे आजार. या आजार असलेल्या रुग्णांची माहिती स्थानिक वैद्यकीय पर्यवेक्षक किंवा अधिकारी यांना देणे खाजगी रुग्णालये व वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना बंधनकारक आहे. मात्र अशी माहिती आरोग्य यंत्रणेला मिळत नाही. Instructions for private medical practitioners
अनुसूची ३ नुसार शुश्रूषागृहात पुढील दरपत्रक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. प्रवेश शुल्क, प्रतिदिनी आंतररुग्ण दर (खाटा/अतिदक्षता कक्ष), वैद्य शुल्क (प्रतिभेट), सहाय्यक वैद्य शुल्क (प्रतिभेट), ५ भूल शुल्क (प्रतिभेट), शस्त्रक्रिया शुल्क, शस्त्रक्रिया सहाय्यक शुल्क, भूल सहाय्यक शुल्क (प्रतिभेट), शुश्रूषा शुल्क (प्रति दिन ), सलाईन व रक्त संक्रमण शुल्क, विशेष भेट शुल्क, मल्टीपॅरा मॉनिटर शुल्क, पॅथॉलॉजी शुल्क, ऑक्सिजन शुल्क, रेडियोलॉजी व सोनोग्राफी शुल्क. उपरोक्त प्रमाणे अनुसूची माहिती सादर न करणा-या खासगी व्यसायिकांवर साथरोग अधिनियम १८९७ नुसार व अनुसूची २ नुसार शुश्रुषागृहात दरपत्रक प्रदर्शित न करणा-या खासगी वैद्यकीय व्यसायिकांवर महाराष्ट्र शुश्रुषा नोंदणी अधिनियम २०२१ (सुधारीत) नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सकांनी यांनी कळविले आहे. Instructions for private medical practitioners