परशोत्तम रुपाला, वेलदूरमध्ये मच्छीमारांची घेतली भेट
गुहागर, ता. 22 : सर्व मच्छीमार संस्थांनी आपल्या सभासदांचा गट विमा काढावा. मच्छीमार सभासदांना किसान क्रेडीट कार्ड, ई श्रम कार्ड काढण्यास प्रवृत्त करावे. असे आवाहन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांनी केले. ते वेलदूर येथे सागर परिक्रमा कार्यक्रमात बोलत होते. Institutions should take out group insurance for members
गुरुवारी समुद्रमार्गे रत्नागिरीला जाण्यापूर्वी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला वेलदूर येथे गुहागर व दापोली तालुक्यातील मच्छीमारांना भेटण्यासाठी आले होते. दाभोळ – वेलदूर परिसरात खोल समुद्रात तटरक्षक दलाची बोट उभी करुन तेथून ते कस्टमच्या स्पीडबोटने वेलदूरला आले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. सविताबेन रुपाला याही होत्या. वेलदूर जेटीवर पारंपरिक वाद्य खालुचा बाजा व लेझीम पथकाने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री रुपाला यांना मिरवणुकीने राधाकृष्ण मंदिराच्या प्रागंणात आणण्यात आले. तेथे कोळी बांधवांनी दोन समुह नृत्य सादर केली. Institutions should take out group insurance for members
औपचारीक स्वागत समारंभ झाल्यावर निवडक मच्छीमारांनी रुपाला यांच्यासमोर मच्छीमारी व्यवसाय सद्यस्थिती, संकटे याविषयी माहिती दिली. यामध्ये मच्छीमारांशी संबधित 8 संस्थांचे पदाधिकारी असलेले, गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल तथा बावाशेठ भालेकर यांनी दाभोळ खाडी व समुद्रादरम्यान वाळुचा पट्टा (गाद) तयार झाल्याने मच्छीमारी मच्छीमार नौकांना धोकादायक परिस्थितीतून समुद्रात जावे लागते. दाभोळ खाडीतील औद्योगिक विकास खुंटला आहे. त्यामुळे हा वाळुचा पट्टा काढुन टाकण्याची व्यवस्था तातडीने व्हावी. गेल्या 40 वर्षात नौका बांधणीसाठी दिलेल्या ज्या कर्जांची परतफेड झालेली नाही अशा कर्ज प्रकरणांची चौकशी करुन एनसीडीसीने ती निकाली काढावी. यांत्रिकीकरणासाठी आलेले प्रस्तावांना विनाविलंब मंजुरी द्यावी. मत्स्य दुष्काळ जाहीर करावा. अशा विविध 19 अडचणींची सविस्तर मांडणी त्यांनी केली. Institutions should take out group insurance for members
हर्णै येथील पी.एन. चोगले यांनी पर्शियन नेट व एलईडी मच्छीमारीमुळे पारंपारिक मच्छीमारी व्यवसाय धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांप्रमाणे कमी व्याजदरात कर्ज पुरवठा व्हावा. मत्स्य दुष्काळाचे निकष बदलावे. अशा मागण्या केल्या. पडवे येथील मकबुल जांभारकर यांनी पडवेमध्ये मच्छीमार जेटीची मागणी केली. तर वेळणेश्र्वर कारुळ येथील महिला मच्छी व्यावसायिक रविना अडूरकर यांनी टोपली घेवून मच्छी विकण्यासाठी जाणाऱ्या महिलांच्या व्यथा मांडल्या. मत्स्य व्यवसाय खात्याचे सचिव पाटणे यांनी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तळागाळात पोचवून जास्तीत जास्त घटकांनी लाभ घ्यावा. प्रभावीपणे राबवली जावी. असे आवाहन केले. Institutions should take out group insurance for members
केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच देशातील मच्छीमारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र मंत्रालय सुरु करुन मच्छी व्यवसायाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतुद केली आहे. शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांसाठी अनेक योजना या मंत्रालयामार्फत राबविल्या जात आहेत. या सर्व योजना आपल्यापर्यंत पोचवाव्यात. तसेच देशातील मच्छीमारांच्या समस्या जाणून घ्याव्यात यासाठी जाणिवपूर्वक समुद्रमार्गे देशाच्या किनारपट्टीवरुन मी प्रवास करत आहे. आपल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचा केंद्र सरकार निश्चित प्रयत्न करेल. आपणही केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा सहभाग घेऊन देशातील मच्छी व्यवसाय वाढवा. देशाची किनारपट्टी समृध्द आणि सुरक्षित करावी. Institutions should take out group insurance for members
कार्यक्रमाच्या औपचारीक समारोपानंतर गुहागर, दापोली तालुका आणि दाभोळ खाडीतील मच्छीमारांच्या 22 संस्था, संघटनांनी दिलेली निवेदन केंद्रीय मंत्री रुपाला यांनी स्विकारली. या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे महाराष्ट्राचे सचिव अतुल पाटणे, सह युक्त मत्स्य व्यवसाय युवराज चौगुले, केंद्रीय मंत्री रुपाला यांचे विशेष कार्यअधिकारी अजय तिवारी व व्यक्तिगत सचिव रामसिंग, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव, परवाना अधिकारी, गुहागर स्वप्नील चव्हाण, परवाना अधिकारी, दापोली दिप्ती साळवी, गुहागरच्या तहहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, गुहागर व दापोली तालुक्यातील मच्छी व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. Institutions should take out group insurance for members