• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विशेष घडवलेंकडे राममूर्तीची स्थापना

by Mayuresh Patnakar
January 11, 2024
in Guhagar
240 2
0
Installation of Ramamurthy at Aregav
471
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उपमुख्यमंत्र्यांकडून भेट, अयोध्येतून आलेली मूर्ती

गुहागर, ता. 11 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अनुलोमचे प्रमुख मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व वस्तीमित्रांना अयोध्येतील राम मुर्ती भेट दिली आहे. आरेगांवमधील विशेष घडवले यांच्याकडे या राममूर्तीची आज स्थापना करण्यात आली. यावेळी गावातील 60 ग्रामस्थ उपस्थित होते. Installation of Ramamurthy at Aregav

Installation of Ramamurthy at Aregav

शासन आणि जनता यामधील दुवा बनुन लोकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनुलोम ही संस्था काम करते. 2016 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने महाराष्ट्रातील लाखो ग्रामस्थांना विविध योजना पोचविल्या. दुष्काळी भागात जलयुक्त शिवाय योजनेचे काम लोकांच्या सहभागातून उभे केले.  22 जानेवारीला श्रीरामांची प्रतिष्ठापना अयोध्येतील राम मंदिरात होणार आहे. त्यानिमित्ताने गावागावातील मंदिरात 22 जानेवारीला कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्र्वभुमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुलोमच्या सर्व वस्तीमित्रांना अयोध्येतून आणलेल्या श्रीराम मूर्ती भेट म्हणून दिल्या आहेत. Installation of Ramamurthy at Aregav

Installation of Ramamurthy at Aregav

गुहागरचे वस्तीमित्र विशेष घडवले, आरेगांव यांच्या घरी आज ही मूर्ती पोचली. तेथील ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यापासून  मिरवणूकीने श्रीराम मूर्ती विशेष घडवले यांच्या घरापर्यंत आणली. घरामध्ये सुवासिनींनी मुर्तीचे औक्षण केले. त्यानंतर सजवलेल्या मंचावर श्रीराम मूर्ती स्थानपन्न करण्यात आली. विशेष घडवले यांनी या मूर्तीचे पूजन केले. त्यावेळी सर्वांनी श्रीराम जयराम जय जय रामचा नामजप केला. त्यानंतर मयूरेश पाटणकर यांनी राममंदिराचा 500 वर्षांचा संघर्ष सर्वांना सांगितला. या मुर्तीसोबत विशेष घडवले यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. उपस्थितांपैकी ज्येष्ठ ग्रामस्थ शांताराम घडवले यांनी हे पत्र सन्मानपूर्वक विशेष घडवले कुटुंबाला दिले. कार्यक्रमाचे आभार मानताना विशेष घडवले यांनी 22 जानेवारीला श्रीराम मंदिर आरे येथे होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. दर्शन सोहळ्याने या कार्यक्रमाची सांगता झाली. Installation of Ramamurthy at Aregav

Installation of Ramamurthy at Aregav

या सोहळ्याला आरेगावचे सरपंच समित घडवले, ग्रामपंचायत सदस्य दिपक वानरकर, समीर पारदळे, वाकी पिंपळवटचे पोलीस पाटील विजय पागडे,  तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश सावंत,  माजी सरपंच सौ. शलाका माने (आशा सेविका),  श्रीकांत महाजन, माजी उपसरपंच शांताराम घडवले, साईनाथ कळझुणकर, अनुलोमचे स्थानमित्र रविंद्र मुके, सौ. मधुरा मोरे व सौ. अमृता जोशी यांच्यासह 60 ग्रामस्थ उपस्थित होते. Installation of Ramamurthy at Aregav

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInstallation of Ramamurthy at AregavLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share188SendTweet118
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.