महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे; सतेज नलावडे
रत्नागिरी, ता. 10 : एसटी बसेस मध्ये आग विझवण्याचे संयंत्र बसवण्याचे पत्र उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी काढले. भाजपा जिल्हा सरचिटणीस सतीश नलावडे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता प्रवाशांचे जीवाशी खेळ करू नये असे पत्र त्यांनी एसटी विभाग नियंत्रण आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले होते. Installation of Fire Extinguishing Plant in ST
दीड वर्षापूर्वी रत्नागिरी एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे याना महामंडळाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस मधील गंभीर त्रुटींबाबत पत्र दिले होते, परंतु त्याबाबत विभाग नियंत्रक यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. म्हणून भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी सहाय्यक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर याना भेटून जवळ जवळ सर्व बसेसमध्ये आग विझवण्याचे संयंत्र नाही किंवा कालबाह्य असल्याबाबत कारवाई करण्याचे पत्र दिले व चर्चा केली. तीन प्रवासी असणाऱ्या रिक्षावर जर संयंत्र नसेल तर त्वरित कारवाई होते, मग बसेसवर का नाही ही बाब निदर्शनास आणली. यानंतर सहायक उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी ही बाब गंभीरपणे घेत अशा बसेसवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश काढले. या वेळी भाजपा पदाधिकारी प्रशांत सनगरे उपस्थित होते. Installation of Fire Extinguishing Plant in ST
प्रवाशांनीही प्रवास करताना संयंत्र नसल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ तक्रार करावी, असे सूचित करण्यात आले आहे. पत्राची दखल त्वरित घेतल्याबद्दल सतेज नलावडे यांनी ताम्हणकर यांचे आभार मानले. Installation of Fire Extinguishing Plant in ST