नौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण
गुहागर, ता. 06 : भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, ‘आत्मनिर्भर भारताच्या’ उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी, संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत 2 सप्टेंबर 2022 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कोचीन शिपयार्ड लिमिटेड इथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी वसाहतवादी गुलामीच्या खुणा पुसून टाकणाऱ्या आणि भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची साक्ष देणाऱ्या नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील राष्ट्रार्पण केले. हा ध्वज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला. INS Vikrant
आयएनएस विक्रांत
आयएनएस विक्रांत ही युद्धनौका, भारतीय नौदलाच्या (Indian Navy) अखत्यारीत येणारी संस्था, युद्धनौका संरचना विभाग (WDB) ने या जहाजाची संरचना तयार केली असून, तिची निर्मिती, जहाजबांधणी मंत्रालयाच्या अधीन असलेली, सार्वजनिक जहाजबांधणी संस्था, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तिची निर्मिती केली आहे. या जहाजात सर्व अत्याधुनिक स्वयंचलित वैशिष्ट्ये आणि उपकरणे आहेत. भारतीय नौदलाच्या इतिहासातील आजवरची ही सर्वात मोठी युद्धनौका आहे. INS Vikrant
262.5 मीटर लांब आणि 61.6 मीटर रुंद असलेल्या विक्रांतचे वजन सुमारे 43,000 टन इतके आहे. याचा कमाल वेग 28 नॉट इतका असून, इंजिनाची कमाल क्षमता 7,500 नॉटिकल मैल इतकी आहे. ह्या जहाजावर 2200 कंपार्टमेंट्स असून 1600 कर्मचाऱ्यांची- ज्यात महिला अधिकारी आणि खलाशी यांच्या राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ही विमानवाहू नौका, अत्यंत उच्च दर्जाच्या मशीनरी चालवणाऱ्या, दिशादर्शक आणि स्वयंसंरक्षित अशा स्वयंचलित यंत्रणेने युक्त आहे. त्यावर अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रणा लावल्या आहेत. INS Vikrant
मिग- 29, के लढाऊ जेट, कमोव्ह-31, MH-60R- ही लढावू विमाने ,बहुपयोगी हेलिकॉप्टर्स – अशी 30 विमानं तैनात आणि कार्यरत असण्याची या नौकेवर क्षमता आहे. त्याशिवाय, देशी बनावटीचे, अत्याधुनिक हलके हेलिकॉप्टर, आणि हलक्या वजनाची लढावू विमाने देखील इथून हालचाली करु शकतात. शॉर्ट टेक ऑफ बट अरेस्टेड रिकव्हरी (STOBAR) ही नवी लढावू विमान संचलन व्यवस्था वापरण्यास सक्षम, असे विक्रांत, स्की-जंप सुविधेने युक्त आहे. तसेच, “अरेस्टर वायर्सचा संच यात आहे. INS Vikrant
आयएनएस विक्रांत ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले की, आज इथे केरळच्या किनाऱ्यावर प्रत्येक भारतीय, भविष्याच्या नव्या सूर्योदयाचा साक्षीदार आहे. ही जागतिक नकाशावर सातत्याने उंचावत असलेले भारताचे मनोबल दर्शवणारी घटना आहे. आज स्वातंत्र्य सैनिकांचे सक्षम आणि शक्तिशाली भारताचे स्वप्न साकार होताना आपण बघत आहोत. विक्रांत ही स्वदेशी क्षमता, स्वदेशी स्रोत आणि स्वदेशी कौशल्य याचे अद्वितीय प्रतीक आहे. याच्या एअरबेसमध्ये लावलेले पोलाद देखील स्वदेशी बनावटीचे आहे आणि ते डीआरडीने विकसित केले आहे. यावर इतकी वीज निर्माण होते, की ज्यामुळे 5,000 घरांना वीज पुरवठा होऊ शकतो आणि यात वापरण्यात आलेल्या वायरिंगची लांबी इतकी आहे, ते कोची पासून काशीपर्यंत पोहोचू शकेल. INS Vikrant
विक्रांत ही केवळ युद्धनौकाच नाही. हे 21व्या शतकातील भारताची मेहनत, कौशल्य, प्रभाव आणि कटिबद्धता याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जेव्हा दूरचे लक्ष्य असते, प्रवास मोठा असतो, समुद्र आणि आव्हाने अनंत असतात, तेव्हा त्याला भारताचे उत्तर आहे विक्रांत. कशाशीही तुलना न होऊ शकणारे, अतुल्य असे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे अमृत म्हणजे विक्रांत INS Vikrant
भारत, स्वदेशी तंत्रज्ञानाने इतक्या महाकाय विमानवाहू नौका बनविणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आएनएस विक्रांतने देशाला नवा आत्मविश्वास दिला आहे, देशात नवीन आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. या प्रकल्पावर काम करणारे नौदल अधिकारी, कोचीन जहाज बांधणी केंद्राचे अभियंते, वैज्ञानिक आणि विशेषतः कामगारांचे अभिनंदन केले, त्यांची प्रशंसा केली. ओणमच्या शुभ आणि आनंदी मुहूर्तावर हा कार्यक्रम होत असल्याने या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. INS Vikrant
यावेळी बोलतांना, नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला 100 वर्षे पूर्ण होतील, त्यावेळी, India@100 म्हणजे, 2047 पर्यंत नौदल पूर्णपणे आत्मनिर्भर होईल. स्वदेशी बनावटीची जहाजे, पाणबुड्या, लढावू विमाने, मानवरहित जहाजे आणि यंत्रणा याने सुसज्ज असे भारतीय नौदल युद्धासाठी सज्ज, विश्वासार्ह, एकात्मिक आणि भविष्यासाठी सज्ज असे दल ठरेल. नौदलप्रमुखांनी, यावेळी, भारताची पहिली युद्धनौका, आयएनएस विक्रांत, जिने 1971 च्या युद्धात महत्वाची कामगिरी बजावत, देशाची 36 वर्षे सेवा केली, त्याचे स्मरण करत, हा वारसा पुढे नेण्याचे आवाहन कमांडिंग अधिकारी आणि आयएनएस वरील सैनिक आणि कर्मचाऱ्यांना केले INS Vikrant
नौदलाचे नवे निशाण (ध्वज)
भारताच्या वसाहतवादी गुलामीच्या खुणा पूसून टाकण्याच्या संकल्पाला अनुसरून, भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ध्वजाचे नव्याने आरेखन करुन, त्यात भारताच्या प्रेरणादायी इतिहासाचा वारसा चिन्हांकित करण्याचा विचार पुढे आला. त्यानुसार, पांढरे निशाण, असलेल्या नौदलाच्या झेंड्यावर आता, दोन महत्वाचे घटक असतील- एक डावीकडे वर आपला तिरंगा ध्वज आणि नेव्ही ब्लू-म्हणजे गडद निळ्या रंगाचा – भोवती सुवर्ण अष्टकोन असलेली मुद्रा ध्वजदंडाच्या दुसऱ्या बाजूला मध्यभागी असेल. ह्या सुवर्ण अष्टकोनाच्या आत, अशोक स्तंभ हे आपले राष्ट्रीय चिन्ह आहे, तिथेच देवनागरी लिपीत सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. त्याखाली, जहाजाचा नांगर आहे. त्याच्या खाली – ‘शं नो वरुण:’(वरुण देवाची आमच्यावर कृपा असावी) हे नौदलाचे बोधवाक्य सुवर्णाक्षरात लिहिलेले आहे. INS Vikrant
नौदलाच्या नव्या ध्वजाचे राष्ट्रार्पन करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, 2 सप्टेंबर 2022 हा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक ठरला असून, भारताने, गुलामीच्या खुणा, गुलामीचे ओझे काढून फेकून दिले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.आतापर्यंत, भारतीय नौदलाच्या ध्वजावर, गुलामीची खूण कायम होती. मात्र, आजपासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन, तयार करण्यात आलेला हा नौदलाचा नवा ध्वज, भारताच्या समुद्रात आणि आकाशात दिमाखाने फडकेल. INS Vikrant ह्या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल, आरीफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, व्ही. मुरलीधरन, अजय भट्ट, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, नौदलप्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. INS Vikrant