तक्रार अर्जानंतर तब्बल दोन महिन्याने कार्यवाही
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदईने २९ फेब्रुवारी रोजी छापून आणलेल्या कामांची बोगस निविदेच्या तक्रारीनंतर तब्बल दोन महिन्याने पंचायत समिती विस्तार अधिकारी यांना चौकशीचा मुहूर्त सापडला असून १५ मे रोजी वेळणेश्वर ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी लावण्यात आली आहे. Inquiry into bogus tender case
तालुक्यात वृत्तपत्राची एकही प्रत न येणारी, बाहेर प्रसिद्ध होऊन त्यामध्ये निविदा नाही परंतु दोन चार वृत्तपत्राच्या प्रतींमध्ये निविदा प्रसिद्ध करून बोगस निविदा छापण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पहावयास मिळतो. याच पार्श्वभूमिवर वेळणेश्वर ग्रामपंचायतीमधील बोगस निविदा प्रकरण चांगलेच पुढे आले आहे. तब्बल ९ ते १० कामांची ही निविदा २९ फेब्रुवारी रोजी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयातील त्या वृत्तपत्रात निविदा होती. परंतु बाहेर विक्रीला असणाऱ्या प्रतींमध्ये निविदाच दिसून येत नाही. हा सर्व प्रकार वेळणेश्वरमधील जागृत नागरीकांनी उघड केला व सरपंचांसहीत ग्रामसेवकांना धारेवर धरले. अखेर सदर निविदा रद्द करून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु येथील सुरेंद्र घाग यांनी ११ मार्च रोजी या बोगस निविदेप्रकरणी तक्रार दाखल केली होती. Inquiry into bogus tender case
या तक्रारीची दखल गटविकास अधिकारी यांनी घेत येथील विस्तार अधिकारी बी. जी. देवकाते यांना चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान गेले दोन महिने याप्रकरणी कोणतीच कार्यवाही झालेली नाही. निविदा रद्द केली असता विषय संपला, असे म्हणत हा विषय दाबण्याचा प्रयत्न होत होता. परंतु प्रशासकीय पातळीवर हे चुकीचे आहे. एवढेच नव्हे तर ग्रामपंचायतीने २९ फेब्रुवारी रोजी ज्या वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध केलेली म्हटले आहे. त्या वृत्तपत्राच्या संपादकांनी सदर निविदा आपण छापलीच नाही. असे लेखी दिले आहे. यामुळे सदर निविदा प्रकरण बोगस ठरणार आहे. याच पार्श्वभूमिवर आता १५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता वेळणेश्वर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच, ग्रामसेवक व तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलावली असून तसे पत्र विस्तार अधिकारी बी. जी. देवकाते यांनी काढले आहे. Inquiry into bogus tender case