मृत्यूनंतर संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार
गुहागर, ता. 27 : Inheritance tax law Again? हिंदू आणि अन्य धर्मांमध्ये काँग्रेसने नेहमीच भेदभाव केलेल्या काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अल्पसंख्यांक मतदारांना खुश करण्यासाठी अनेक घोषणा करत आहेत. त्यातील एक घोषणा म्हणजे संपत्तीचे समान वाटप. याच विचारसरणीमधुन आज कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने हिंदु मंदिरांवर सरकारी नियंत्रण आणले आहे. मंदिरामध्ये जमा होत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर ताबा मिळवून तो मोफत सुविधा देण्यासाठी वापरला जात आहे. Inheritance tax law Again?
देशातील नागरिकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण करून त्याचे गरीबांना पुनर्वितरण करण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेनंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा करण्याच्या (वारसा कर कायदा – inheritance Tax) योजनेचे सूतोवाच केले आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या संपत्तीचे पुनर्वितरण करून आर्थिक असमानता दूर करणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे. Inheritance tax law Again?
वारसा कर कायदा देशात यापूर्वीही अस्तित्वात होता. इस्टेट ड्युटी कायदा 1953 अंतर्गत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसावरील कर 85% पर्यंत जाऊ शकत होता. हा कर 20 लाखांहुन अधिक संपत्तीवर लावला जात होता. मात्र 1985 मध्ये राजीव गांधी यांच्या काँग्रेस सरकारनेच हा कायदा रद्द केला होता. Inheritance tax law Again?
पुन्हा एकदा राहुल गांधींनी प्रचारादरम्यान काँग्रेस सत्तेत आली तर संपत्तीचे सर्वेक्षण करुन त्याचे गरीबांना पुनर्वितरण करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे जवळचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी अमेरिकेच्या वारसा कराचे उदाहरण देवून देशातील संपत्तीच्या पुनर्विरणामागील तर्कशास्त्र सांगितले. सॅम पित्रोदा म्हणतात, अमेरिकेत वारसा कर आहे. जर एखाद्याकडे 100 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या नावाने असलेल्या संपत्तीपैकी केवळ 45 टक्के संपत्ती त्यांच्या वारशांना हस्तांतरित होते. उर्वरित 55% संपत्ती सरकार ताब्यात घेते. कारण ही संपत्ती कमावणाऱ्या व्यक्तींने समाजाच्या मदतीमुळेच एवढे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या उत्पन्नातील 55% भाग जनतेला मिळाला पाहिजे. तुम्ही तुमची संपत्ती लोकांसाठी सोडली पाहिजे, असे मला वाटते. जेव्हा आपण संपत्तीचे पुनर्वितरण करण्याबद्दल बोलतो तेव्हा आपण नवीन धोरणे आणि नवीन कार्यक्रमांबद्दल बोलतो जे लोकांच्या हिताचे आहेत आणि अतिश्रीमंतांच्या हिताचे नाहीत. Inheritance tax law Again?
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह एनडीएनने या प्रस्तावावर जोरदार टिका केली आहे. मात्र राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला समर्थन देणाऱ्या अन्य पक्षांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. याचा अर्थ इंडिया आघाडीतील घटक पक्षांची संपत्तीच्या वाटपाला मुकसंमती आहे असा होतो. Inheritance tax law Again?