गुहागर,ता. 07 : गुहागर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक, महसूल कर्मचारी यांची एकत्रित मीटिंग घेऊन एक जुलै पासून अमलात आलेल्या नवीन कायद्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी दिली. 8 भारतीय दंड संहिता या जुन्या कायद्याऐवजी भारतीय न्याय संहिता कायद्याची अंमलबाजवणी 1 जुलै 2024 पासून होणार असून याबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक यांचेकडून प्राप्त पत्रक उपस्थितांना वाटण्यात आली व सदर कायद्याविषयी आपले गावात जनजागृती करणेबाबत पोलीस पाटील व महिला दक्षता समितीतील सदस्य यांना अवगत करण्यात आले. Information about laws through police station
आपल्या गावात कामानिमित्त वास्तव्यास असणारे परप्रांतीय (झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश व इतर राज्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील कामगारांविषयी सविस्तर माहिती पोलीस ठाणे येथे कळवण्यास सांगितले. आगामी मोहरम व आषाढी एकादशी सणाचे अनुषंगाने सुचना देवून काही माहिती असल्यास पोलीस ठाणे ते कळवणे बाबत सूचना दिल्या. महात्मा गांधी तंटामुक्ती समिती बाबत सविस्तर माहिती घेऊन पोलीस ठाणे येथे कळवण्यास सांगितले. अवैध धंद्याबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीस ठाणे ते कळवणे बाबत सूचना दिल्या. Information about laws through police station
सध्या पावसाचे दिवस असल्याने काही आपत्ती जनक घटना घडल्यास तात्काळ पोलीस ठाणे येथे संपर्क करण्याबाबत सांगितले. बँक पतसंस्था सोन्या-चांदीचे दुकाने तसेच मंदिरातील दानपेटी चोरी तसेच मौल्यवान वस्तूंची चोरी अशा घटना होऊ नये याकरिता संबंधित आस्थापना कमिटी सदस्य यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे तसेच सुरक्षारक्षक नेमणेबाबत सूचना देण्यात आल्या. या सभेला गुहागर तालुक्यातील पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, महिला दक्षता समितीचे सदस्य आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. Information about laws through police station