गुहागर, ता. 10 : जागतिक महिला दिनानिमित्त विसापूर येथे महिलांसाठी आरोग्य योजनांची माहिती आणि महिलांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी योगा विषयक माहिती देवून महिला मेळावा मोठया उत्साहात पार पडला. या मेळाव्याला महिलांची मोठी उपस्थिती होती. Information about health schemes for women in Visapur


या मेळाव्याला विस्तार अधिकारी शरद भांड, प्रज्ञा धामणस्कर यांनी महिला दिनाबाबत मार्गदर्शन केले. तर आरोग्य सेवक वैभव जाधव यांनी आरोग्य योजनेची माहिती, अदिती धनावडे यांनी महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी योगा विषयक माहिती दिली. Information about health schemes for women in Visapur


या मेळाव्याला ग्रामपंचायत अधिकारी पी. डी. धोपट, महिला अध्यक्ष सुचिता आग्रे, माजी सरपंच साहिती वेद्रे, काशीराम खाकम, समुदाय आरोग्य अधिकारी श्री. शेळके, धोंडू बेंडल, मंगेश कदम, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष नरेश वेद्रे, अंगणवाडी सेविका श्रावणी धोपट, विसापूर उपसरपंच सुरेश नवरत आणि बचत गटाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडू बेंडल यांनी केले. Information about health schemes for women in Visapur