• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन

by Guhagar News
December 15, 2022
in Ratnagiri
103 1
0
Informal Sanskrit Education Center Course
202
SHARES
576
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय ; प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम

रत्नागिरी, ता. 15 : शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही, हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे. पाच हजार वर्षे जुनी संस्कृत भाषा शिकण्यासाठी हे ज्येष्ठ विद्यार्थी आले आहेत. ही संख्या अशीच वाढत राहो. जोपर्यंत यश समाधानाच्या पातळीवर उतरत नाही, तोपर्यंत जगण्याला अर्थ नाही. राग आवरा, संयम बाळगा. कारण अनेकांना शाब्दिक विजयाचा आनंद वाटतो, पण तो चुकीचा आहे. नशिब व मेहनतीची किल्ली एकदम लावली की यश मिळतेच, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले. Informal Sanskrit Education Center Course

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

नवी दिल्लीच्या केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्र गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात (Gogte- Joglekar College) चालू आहे. या वर्षीच्या अभ्यासक्रमाचे उद्घाटन व मागील परीक्षांचे प्रमाणपत्र वितरण आज डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, केंद्राच्या प्रमुख आणि संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये व शिक्षक आचार्य विशाल भट्ट उपस्थित होते. Informal Sanskrit Education Center Course

संगीत विशारद, इतिहास, हिंदीचा गाढा अभ्यास असणारे व मुळचे उस्मानाबाद येथील वारकरी श्री. चांदणे हे कीर्तनकार असल्याने त्यांनी अनेक दाखले देत संस्कृतची महती आणि आपण कसे जगावे याबद्दल विवेचन केले. हसतखेळत आणि प्रबोधन करत त्यांनी व्याख्यान दिले. श्री. चांदणे म्हणाले की, साध्य, साधन आणि सिद्धता या तत्त्वावर आपण जीवन जगत असतो. परंतु आपल्याला साधनांचा मोह जडतो. सिद्धतेपर्यंत पोहोचलो की साधने सोडवली जात नाहीत. स्वप्नांना सत्याच्या खांद्यावर बसून प्रगती करायची असते. रत्नागिरीतील सर्व अधिकारी हे मराठी माध्यमातून शिकून मोठे झाले आहेत. सध्या इंग्रजी माध्यमातून शिकण्याकडे अनेकांचा कल दिसतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। मराठीतून शिक्षण, ज्ञान खूप काही मिळते. आपण समाजाप्रती मदत दिली पाहिजे, याची जाणीव ठेवा. सध्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. दृश्य माध्यमातून भाषा शिकली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. Informal Sanskrit Education Center Course

प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले की, महाविद्यालय संस्कृतची चळवळ राबवत आहे. अभ्यास, वाचन, बोलण्याप्रमाणे विद्यार्थ्यांना संगणकावर संस्कृतमधून टापयिंगचे प्रशिक्षण द्यावे. त्यातून संस्कृतचा प्रचार, प्रसाराचे काम आणखी वाढेल. महाविद्यालयात संस्कृतचा शब्द लिहून त्या खाली मराठीतील शब्दसुद्धा लिहिला तर विद्यार्थ्यांचाही शब्दसंग्रह वाढेल. Informal Sanskrit Education Center Course

या वेळी संस्कृत विभागप्रमुख आणि अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राच्या अधिकारी डॉ. कल्पना आठल्ये यांनी प्रास्ताविकामध्ये अनौपचारिक संस्कृत शिक्षण केंद्राविषयी माहिती दिली. संस्कृतचा अभ्यास सोपा आहे, सर्वांना ते शिकता यावे याकरिता भारतात सर्वत्र अभ्यासक्रम शिकवला जातो. भाषा शिक्षणामुळे सर्व विद्यार्थी संस्कृतमध्ये बोलायला शिकतात, असे सांगितले. Informal Sanskrit Education Center Course

आचार्य विशालभट्ट यांनी संस्कृत शिक्षण केंद्राच्या भारतभर शाखा आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, असे सांगितले. या वेळी प्रा. जयंत अभ्यंकर यांनी निवेदन केले. प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहा शिवलकर यांनी केले. Informal Sanskrit Education Center Course

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInformal Sanskrit Education Center CourseLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share81SendTweet51
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.