• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुवेत आग दुर्घटनेत ४९ मृतांपैकी ४५ भारतीय

by Guhagar News
June 14, 2024
in Bharat
110 2
1
Indians killed in Kuwait fire accident
217
SHARES
620
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

45 भारतीयांचे मृतदेह घेऊन विमान कोचिनला पोहोचले

कोची, ता. 14 : कुवेतमधील एका इमारतीला लागलेल्या आगीत मरण पावलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे एक विशेष विमान आज ( दि. १४) सकाळी केरळला पोहोचले. केंद्रीय मंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. कीर्तीवर्धन सिंग हे देखील विमानात होते. कुवेतमध्‍ये आगीत होरपळलेल्‍या ४५ जणांपैकी २३ जण ही केरळमधील आहेत. विमान कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच रुग्णवाहिका आणि पोलीस दल तैनात करण्यात आले होते. केरळहून हे विमान पुन्हा दिल्लीला जाणार आहे. Indians killed in Kuwait fire accident

कुवेतमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग दुर्घटनेतील ४९ मृतांपैकी ४५ भारतीय आणि तीन जण फिलिपिनो आहेत. कुवेत सिटीच्या दक्षिणेकडील मंगफ येथे बुधवारी रात्री झालेल्या स्फोटात एका मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. या इमारतीत १९६ परप्रांतीय कामगार राहत होते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांव्यतिरिक्त सुमारे 50 जण जखमी झाले आहेत. Indians killed in Kuwait fire accident

भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी कुवेत आगीत बचावलेल्‍यांच आणि तपासकर्त्यांची भेट घेतली. प्राथमिक तपासात गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. सात मजली इमारतीच्या तळमजल्यावर सुमारे दोन डझन गॅस सिलिंडर होते. या इमारतीमध्‍ये १९६ कामगार पुठ्ठ्यांसह अरुंद क्वार्टरमध्ये राहत होते. कामगारांचे वास्‍तव्‍य असणार्‍या ठिकाणी पेपर, पुठ्ठा आणि प्लास्टिक सारख्या ज्वलनशील पदार्थांचा वापर केला जात होता. त्याचवेळी इमारतीचे छताचे दरवाजेही बंद झाले. त्यामुळे आगीनंतर कामगारांना आगीच्‍या तावडीतून सुटका करुन घेण्‍याची संधीही मिळाली नाही. Indians killed in Kuwait fire accident

मृतांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी घेण्यात आली ओळख प्रक्रियेचा एक भाग म्हणून कुवेती अधिकाऱ्यांनी आधीच मृतदेहांवर डीएनए चाचणी केली आहे. ही आग ‘इलेक्ट्रिकल सर्किट’मुळे लागल्याचे कुवेती अग्निशमन दलाने म्हटले आहे. मंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी आखाती देशांचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या, अल-सबाह आणि आरोग्य मंत्री अहमद अब्देलवाहाब अहमद अल-अवादी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. कीर्तीवर्धन सिंग यांनी मुबारक अल कबीर रुग्णालय आणि जाबेर रुग्णालयालाही भेट दिली, जिथे अनेक जखमी भारतीयांना दाखल करण्यात आले होते. शेख फहाद गुरुवारी कुवेतमधील अनेक भागात अवैध मालमत्तेवर व्यापक तपासणी मोहिमेचे नेतृत्व करत आहे. Indians killed in Kuwait fire accident

लुलु ग्रुपने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹5 लाखांची मदत आणि UAE स्थित लुलू ग्रुपचे अध्यक्ष एमए युसूफ अलीने कुवेतच्या आगीच्या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना ₹5 लाखांची मदत जाहीर केली आहे. या मदत निधीचा एक भाग म्हणून प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये दिले जातील, असे अबू धाबीमधील समूहाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. Indians killed in Kuwait fire accident

पीएम रिलीफ फंडातून 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत बुधवारी रात्री पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएसए अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पीके मिश्रा आदींचा समावेश आहे. बैठकीनंतर, पंतप्रधान मोदींनी मृत भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून ₹ 2 लाखांची सानुग्रह मदत जाहीर केली आणि सरकारने सर्व शक्य मदत देण्याचे निर्देश दिले. Indians killed in Kuwait fire accident

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सांगितले की, कुवेतमधील आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सात तामिळींचाही समावेश आहे. आंध्र प्रदेश-उत्तर प्रदेशातील कामगारांनाही आपला जीव गमवावा लागला आहे, असे आंध्र प्रदेश सरकारने सांगितले की, कुवेतमध्ये नुकत्याच झालेल्या आगीच्या घटनेत राज्यातील तीन स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने सांगितले की, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांपैकी तीन जण उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. Indians killed in Kuwait fire accident

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndians killed in Kuwait fire accidentLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share87SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.