• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मतीमंदत्वाची कारणे आयसीएमआर निश्चित करणार

by Mayuresh Patnakar
April 23, 2025
in Guhagar
109 2
0
Indian Medical Research Team
215
SHARES
614
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

साखरी आगर मध्ये शिबिर, पुढील टप्प्यात उपचार,  जनजागृती

गुहागर ता. २४ : तालुक्यातील साखरी आगर गावात मतिमंदत्व दोष असलेल्या मुलांची संख्या जास्त आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या टिमने या सर्व रुग्णांची तपासणी, इतिहास याची तपशीलवार नोंद करून घेतली आहे. तसेच रक्ताचे नमुने घेतले आहेत. आता याबाबत अधिकचे संशोधन करून या समस्येची कारणे भारतीय वैद्यक संशोधन परिषद शोधणार आहे. Indian Medical Research Team

Indian Medical Research Team

साखरीआगर गावात  १८ पेक्षा कमी वयाची ८ मुले आहेत. एकाच कुटुंबात तीन मुले मतिमंद आहेत. या गंभीर समस्येची कारणमीमांसा शोधण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेची टीम आज साखरी आगर मध्ये आली होती. बाल कल्याण समिती रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अनुलोम संस्थेच्या माध्यमातून या समस्येच्या निराकरणासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. Indian Medical Research Team

साखरी आगर मध्ये मतिमंद मुलांची संख्या अधिक असल्याचे बालसंगोपन समितीच्या निदर्शनास आले. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी   हा विषय आयसीएमआर म्हणजेच वैद्यकीय संशोधन परिषदेपर्यंत पोचवला. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे डॉ. शैलेश पांडे यांनी या समस्येच्या कारणांचा शोध घेण्यासाठी साखरीआगर गावाला भेट देण्याचे निश्चित केले.  यासाठी समन्वय म्हणून अनुलोमनेही सहभाग घेतला.  Indian Medical Research Team

Indian Medical Research Team

बुधवारी (ता.२३) भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे डॉ. शैलेश पांडे, डॉ. धनजीत दास, डॉ. शैनी जोसेफ, शायनी बाबु, किसन माळी अशी टीम साखरीआगर ग्रामपंचायतीत आली. साखरीआगर ग्रामपंचायत, हेदवी आरोग्य केंद्र व स्थानिक आशा सेविकांनी ८ मतिमंद मुले व त्यांचे पालक, तसेच ७ मतीमंद तरूण यांना ग्रामपंचायतीत एकत्र केले होते. यावेळी साखरीआगरच्या सरपंच सौ. दुर्वा पाटील, उपसरपंच सुदाम आंबेरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी जांगीड, बाल कल्याण समितीचे शिरीष दामले, अनुलोमचे भाग जनसेवक मयूरेश पाटणकर उपस्थित होते. Indian Medical Research Team

जनुकीय दोष असलेल्या कुटुंबातील व्यक्ती या दोषांच्या वाहक असतात. अज्ञान, दोष समजला तरी योग्य उपचार न मिळणे यामुळे हा दोष पुढील पिढीत संक्रमित होत रहातो. अशा ७ हजार जनुकीय आजारांवर औषधे उपलब्ध आहेत. साखरीआगर मधील रुग्णांमध्ये कोणते दोष आहेत याची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. संकलीत माहिती व रक्त नमुन्यांचे संशोधनानंतर उपचारांची नेमकी दिशा ठरवता येईल.
– डॉ. शैलेश पांडे

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndian Medical Research TeamLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.