• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पहिली इंडिया स्टॅक डेव्हलपर परिषद संपन्न

by Guhagar News
January 26, 2023
in Bharat
60 1
0
India Stack Developers Council
119
SHARES
339
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आधार, डिजीलॉकर, यूपीआय, उमंग, दीक्षा, ई-संजीवनी सेवांवर चर्चा

दिल्ली, ता. 26 : पहिल्या इंडिया स्टॅक डेव्हलपर परिषदेचे उद्घाटन दि. 25 रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते झाले. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, नॅस्कॉमच्या अध्यक्ष देबजानी घोष आणि अभिषेक सिंग, P&CEO, NeG उपस्थित होते. या कार्यक्रमात CXO/MD/संस्थापक स्तरावर उद्योग संघटना, सिस्टीम इंटिग्रेटर्स आणि स्टार्ट-अप्समधील 100+ डिजिटल प्रमुखांनी  भाग घेतला होता. या कार्यक्रमात जी 20 देशांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. India Stack Developers Council

India Stack Developers Council

राजीव चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या परिषदेचा उद्देश अन्य देशांपर्यंत इंडिया  स्टॅक व्याप्ती आणि अवलंब वाढवणे जे  त्यांच्या गरजेनुसार ते स्वीकारण्यास आणि एकत्रित करण्यास तसेच स्टार्टअप, विकासक आणि  सिस्टीम इंटिग्रेटरची एक मजबूत परिसंस्था  तयार करण्यास उत्सुक आहेत . “एक राष्ट्र म्हणून इंडिया स्टॅक किंवा स्टॅकचा भाग जगभरातील अशा उद्योगांना आणि देशांना उपलब्ध  करणे हे आमचे ध्येय आहे ,  ज्यांना अभिनव संशोधन करायचे आहे आणि डिजिटल परिवर्तनाची  अधिक एकात्मिकपणे अंमलबजावणी करायची आहे.”, असे ते  म्हणाले. India Stack Developers Council

India Stack Developers Council

इंडिया स्टॅकमध्ये आणखी सुधारणा होतील असे सांगून ते  म्हणाले, “आज आपल्याकडे जे आहे ते #IndiaStack 1.0 आहे. ते अधिक सूक्ष्म, बुद्धिमान  आणि अत्याधुनिक होईल आणि काळाच्या ओघात  विकसित होत राहील. डेटा डेटासेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर हा इंडिया स्टॅकच्या नाविन्यपूर्ण प्रवासाचा भाग असेल.” India Stack Developers Council

India Stack Developers Council

आधार, राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान  (NDHM), युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI), डिजिलॉकर, उमंग, एपीआय सेतू, DIKSHA, e-संजीवनी, गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM)सारख्या इंडिया स्टॅक सोल्युशनवर संबंधित संस्थेचे प्रमुख आणि/किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी सादरीकरण केले.  सादरीकरणाची प्रत  https://indiastack.global. वर अपलोड केली आहे. India Stack Developers Council

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndia Stack Developers CouncilLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share48SendTweet30
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.