दिल्ली, ता. 15 : जागतिक स्तरावर मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती काळात मदतीचा हात देण्यात अग्रेसर म्हणून भारताची प्रतिमा निर्माण झाली आहे. असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत 14 मार्च 2023 रोजी मानवतावादी सहाय्य, आपत्ती निवारण, जोखीम कमी करणे आणि आपत्ती लवचिकता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चौहान दूरदृश्य माध्यमातून मार्गदर्शन करत होते. India is a leader in giving helping hands globally
संरक्षण मंत्रालयाअंतर्गत एकीकृत संरक्षण दलाने शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) विद्यमान अध्यक्षपदी भारत आहे, त्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कझाकस्तान, किर्गिझ प्रजासत्ताक, बेलारूस, मंगोलिया, पाकिस्तान आणि चीनमधील व्याख्याते प्रत्यक्ष तर रशियातील व्याख्याते दूरदृश्य माध्यमातून कार्यशाळेत सहभागी झाले होते. India is a leader in giving helping hands globally
“वसुधैव कुटुंबकम – संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या आमच्या सांस्कृतिक तत्वाला अनुसरून, या प्रदेशात आणि त्यापलीकडेही मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सेवा प्रदान करण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे”. नुकत्याच तुर्कीएत झालेल्या भुकंपावेळी ऑपरेशन दोस्त राबवण्यात आले. जगाच्या कानाकोपऱ्यात मदत पोहचवण्याच्या भारताच्या इच्छेची यातून प्रचीती येते, असे ते म्हणाले. India is a leader in giving helping hands globally

आपत्तींमुळे उद्भवणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सामायिक दृष्टीकोन आवश्यक आहे. यासाठी विविध देश आणि बहुपक्षीय संस्थांसोबत बहुपक्षीय सरावांचे आयोजन भारत करत असल्याचे संरक्षणदल प्रमुखांनी सांगितले. पुण्यात 2021 मधे बिम्सटेक सदस्यांसाठी एचएडीआर सराव पॅनेक्स 2021, आग्रा येथे 2022 मधे आसियान सदस्यांसाठी समन्वय 22 इत्यादींचे आयोजन याचा यात समावेश आहे. “प्रादेशिक यंत्रणा, सुधारित आंतरकार्यान्वयन आणि जलद प्रतिसादाद्वारे बहुपक्षीय भागीदारी मजबूत करून, आम्ही या प्रदेशातील प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून आमची भूमिका बजावली आहे,” असे ते म्हणाले. India is a leader in giving helping hands globally
माहितीची देवाणघेवाण, जोखीम कमी करणे, लवचिकता, प्रादेशिक प्रतिसाद, आपत्ती पायाभूत सुविधांमध्ये सशस्त्र दलांचे एकत्रीकरण आणि एससीओ सदस्यांमधील जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी सर्वोत्तम पद्धती सामायिक करणे हा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारणावरील (एचएडीआर) कार्यशाळेचा उद्देश आहे. India is a leader in giving helping hands globally
सदस्य राष्ट्रांमधील परस्पर विश्वास, शेजारधर्म मजबूत करणे, राजकारण, व्यापार, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान आणि संस्कृती तसेच शिक्षण, ऊर्जा, वाहतूक, पर्यटन, पर्यावरण संरक्षण आणि इतर क्षेत्रांमध्ये प्रभावी सहकार्याला प्रोत्साहन देणे, प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी, तसेच ती सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे याबरोबरच लोकशाही असलेली, न्याय्य आणि तर्कसंगत नवीन आंतरराष्ट्रीय राजकीय तसेच आर्थिक व्यवस्था स्थापन करण्याच्या दिशेने वाटचाल करणे ही एससीओची उद्दीष्टे आहेत. India is a leader in giving helping hands globally