नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाच्या वतीने दि.16 ते 26 फेब्रुवारी रोजी आयोजन
दिल्ली, 06 : नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने 16 ते 26 फेब्रुवारी दरम्यान 22 व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम), 2023चे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली, जयपूर, राजमुंद्री, रांची, गुवाहाटी, जम्मू, श्रीनगर, भोपाळ, नाशिक आणि केवडिया येथे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी केवडिया येथे समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. India Color Festival 2023

नाटके आणि सांस्कृतिक कलाविष्कार, जागतिक दृष्टीकोनातून रंगभूमीच्या जागतिक आणि धोरणात्मक महत्त्वाच्या अनेक विषयांवर आधारित परिसंवाद यांचा 22 व्या भारत रंग महोत्सवात समावेश असेल. नाटकांच्या सादरीकरणासाठी विविध राज्यांतील संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. यात स्थानिक कलाकारांचा सहभाग असेल आणि नाट्यकृती स्थानिक लोकांना आकर्षित करतील हे या माध्यमातून सुनिश्चित केले जाईल. India Color Festival 2023
नाटकांसोबतच पुस्तकांचे प्रकाशन, दिग्दर्शक संमेलन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गजांचा मास्टर क्लास असे इतरही संलग्न उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. India Color Festival 2023

अन्य देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम दृढ करणे हे भारत रंग महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. देशभरातील नाट्यपरंपरेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा महोत्सव एक व्यासपीठ निर्माण करतॊ. केवळ कलाकारच नाही तर दिग्गज दिग्दर्शकही या भव्य महोत्सवात सहभागी होणार आहेत. India Color Festival 2023