• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देवरूख, राजापूर, रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

by Guhagar News
April 1, 2023
in Ratnagiri
64 1
0
Independence Veer Savarkar Gaurav Yatra

स्वातंत्र्यवीर सावरकर

126
SHARES
359
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 01 : रत्नागिरीसह देवरूख, राजापूर अशा ३ ठिकाणी भाजप (BJP), व शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत (Press conference) दिली. Independence Veer Savarkar Gaurav Yatra

राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या वतीने राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ४, ५ आणि ६ एप्रिल रोजी ही यात्रा काढली जाणार आहे. रत्नागिरीमध्ये यात्रेचे नेतृत्व कोकण प्रमुख आमदार नीतेश राणे (MLA Nitesh Rane) करणार आहेत, असे ॲड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. Independence Veer Savarkar Gaurav Yatra

ॲड. दीपक पटवर्धन म्हणाले की, सावरकरांबद्दल आदर, प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी भाजपा शिवसेनेच्या वतीने ही गौरव यात्रा १ एप्रिलपासून राज्यात सुरू होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सामाजिक समरसतेचा पाया रत्नागिरीत असताना घातला. रत्नागिरीच्या कारागृहातील शिक्षा आणि स्थानबद्धतेच्या वर्षांची नोंद इतिहासाने घेतली असून, त्यांचे रत्नागिरीशी नाते वेगळेच होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निघणाऱ्या गौरव यात्रेला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरीतील ३ तालुक्यांत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील यात्रेला देवरूख येथून ४ एप्रिल रोजी सुरुवात होणार असून राजापूर येथे ५ एप्रिल रोजी तर रत्नागिरीत ६ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. Independence Veer Savarkar Gaurav Yatra

रत्नागिरीतील यात्रेचे नेतृत्व आमदार नीतेश राणे करणार असून येथील मध्यवर्ती कारागृहापासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. कारागृहातील सावरकरांच्या कोठडीतील तसबिरीला पुष्पहार अर्पण करून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर कारागृह जेल नाका मार्गे ही यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पोहोचेल. तेथे सावरकरप्रेमी आणि प्रमुख मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत. या गौरव यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व सावरकरप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. Independence Veer Savarkar Gaurav Yatra

Tags: BJPGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIndependence Veer SavarkarIndependence Veer Savarkar Gaurav YatraLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Nitesh RaneNews in GuhagarPress ConferenceShiv SenaUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet32
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.