कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण
गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. Independence day celebration in RGPPL company


यावेळी संजय अगरवाल यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांनी केलेल्या परेडचे निरीक्षण केले. बालभारती पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी आरजीपीपीएल कंपनीमध्ये उत्कृष्ठ सेवा बजावणाऱ्या. अधिकाऱ्याना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आरजीपीपीएलच्या त्रेमासिक “रत्नज्योती”अंकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. Independence day celebration in RGPPL company
यावेळी बोलताना संजय अगरवाल यांनी आरजीपीपीएल कंपनी प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत सुरू आहे. कंपनीकडुन परिसरातील गावामध्ये स्वच्छता अभियान, जनजागृतीचे अनेक कार्यक्रम सतत होत आहेत. आयुष्यमान भारत मिशनच्या माध्यमातून वेलंदूर ग्रा. पं. च्या सहकार्याने आम्ही जागतिक पर्यावरण दिन, वेलदूर मध्ये आयुष क्लिनीकची स्थापना करण्यात आली. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागात शाळांमध्ये योगाचे शिबिर घेण्यात आले. कंपनीला बालभारती पब्लिक स्कुल, किड प्लॅनेट, संजना महिला समिती, रेवा समिती तसेच इतर असोसिएट यांचे महत्वपूर्ण योगदान मिळत आहे. तसेच जी.ई, यूपीएल, आयसीएच, सीआयएसएफ व अन्य संस्थांचे योगदान मिळत असते, असे ते म्हणाले. Independence day celebration in RGPPL company


या कार्यक्रमाला संजना महिला समिती अध्यक्षा सीमा अगरवाल, मानव संसाधन विभाग प्रमुख डॉ. जॉन फिलिप्स, सीआयएसएफचे मुख्य अधिकारी पी. वाईफेई, बालभारती पब्लिक स्कुलचे प्राचार्य सुरुजित चटर्जी, आरजीपीपीएल कंपनीचे सर्व विभागाचे मुख्य अधिकारी, कर्मचारी व आरजीपीपीएल परिवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुंजन शर्मा यांनी केले. Independence day celebration in RGPPL company