• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रायगडच्या प्रवाशांचा एसटीवर वाढता भार

by Guhagar News
May 30, 2026
in Bharat
105 1
0
207
SHARES
591
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 30 : रायगड जिल्ह्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, त्यातच मुंबई-मांडवा जलवाहतूक सेवा बंद झाल्याने प्रवाशांचा संपूर्ण भार एसटी महामंडळावर पडला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्यामुळे अनेक पर्यटकांनी समुद्रकिनारे, किल्ले आणि पर्यटनस्थळांसाठी रायगडकडे मोर्चा वळवला आहे. शनिवार-रविवारी अलिबाग, मुरुड आणि आसपासच्या भागातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि कॉटेजेस हाऊसफुल्ल होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जलवाहतूक बंद पडल्याने मुंबईहून रायगडकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता रेल्वे आणि रस्तेमार्गाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. परिणामी, एसटीबसस्थानकांवर मोठी गर्दी होत असून प्रवासाचा वेळ दुप्पट ते तिप्पट वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अलिबाग एसटी आगाराने अतिरिक्त बसेसची तयारी सुरू केली आहे. Increasing Burden of Passengers on ST Buses

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शाळांना सुट्ट्याजलवाहतूक सेवा बंद झाल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. अतिरिक्त बसेसची व्यवस्था केली जात असून, प्रवाशांना वेळेत त्यांच्या गंतव्यस्थळी पोहोचविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. पूर्वी बोटीने अवघ्या एका तासात होणारा प्रवास आता रस्तेमागनि ३ ते ४ तासांचा झाला आहे. जलवाहतूक बंद असल्याने मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना प्रथम रेल्वेने पनवेल गाठावे लागत आहे. त्यानंतर पनवेलहून एसटी किंवा खासगी वाहनाने अलिबाग आणि इतर भागात जावे लागत असल्याने वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अलिबाग, पेण, रोहा आणि मुरुडकडे जाणाऱ्या बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. वाढत्या गर्दीमुळे अनेकांना उभ्याने प्रवास करावा लागत असून, वाहतूक कोंडीमुळे बससेवांचे नियोजनही विस्कळीत होत आहे. जुन्या बसेस आणि अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवाशांच्याअडचणीत अधिक भर पडत आहे. Increasing Burden of Passengers on ST Buses

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अलिबाग एसटी आगार प्रशासनाने विशेष नियोजन सुरू केले आहे. विना थांबा फेऱ्या वाढविण्यासोबतच कर्जत आणि पेण आगारातून अतिरिक्त बसेस मागविण्यात येणार आहेत. गरजेनुसार आणखी बससेवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पर्यटन हंगाम आणि जलवाहतूक बंदी या दुहेरी परिस्थितीमुळे येत्या काही दिवसांत रायगडमधील रस्ते वाहतुकीवरील ताण आणखी वाढणार आहे.विशेषतः आठवड्याच्या शेवटी प्रवाशांनी वेळेचे नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. Increasing Burden of Passengers on ST Buses

Tags: GuhagarGuhagar NewsIncreasing Burden of Passengers on ST BusesLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share83SendTweet52
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.