• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महावितरणाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी चारपट वीजदर वसुली

by Mayuresh Patnakar
December 20, 2022
in Maharashtra
723 7
1
Increased power tariff for Konkan by Maha distribution

Increased power tariff for Konkan by Maha distribution

1.4k
SHARES
4.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जो न्याय रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याना तोच उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असला पाहिजे – शेखर निकम

गुहागर, ता. 20 : कोकणातील बागायतदार शेकतऱ्यांना महावितरणचा वेगळा दर लावून चारपट वसुली केली जात आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रावर मात्र महावितरण मेहरबान होत त्याना वेगळा दर लावण्याचे काम करण्यात आले आहे.  कोकण  खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून वाढीव वीज बिल वसुली करणाऱ्या महावितरण विरोधात आ. शेखर निकम यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. Increased power tariff for Konkan by Maha distribution

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्याचे विरोधीपक्ष नेते ना अजित पवार यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे. तर महावितरणचे एमडी विजय सिंघाल याना याविषयी जाब विचारण्यात आला आहे. तर आ. निकम यांनी अधिवेशनात ही विषय लावून धरला आहे. Increased power tariff for Konkan by Maha distribution

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

कोकण खास करून रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू ,नारळ, सुपारी, चिकू आदी फळपिके कोकणात घेतली जात आहेत याना पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणकडून “एजी” अंतर्गत पंप कनेक्शन घेतली आहेत. मुळात संपूर्ण महाराष्ट्रात फळपिके घेतली जात आहे. आणि त्या बागायतींना महावितरण कडून पाण्यासाठी वीज कनेक्शन देण्यात आली आहेत वीज कनेक्शन आणि वीज दर हा संपुर्ण महाराष्ट्र मध्ये एकच असताना कोकण खास करून रत्नागिरी जिल्ह्यासाठी मात्र सुलतानी दर ठेवण्यात आल्याचे उघड झाले असून चार पट दराने लाखो रुपये महावितरण विभागाने वसूल केले असल्याचे आ. शेखर निकम यांनी सामोरी आणले आहे Increased power tariff for Konkan by Maha distribution

रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदार शेतऱ्याला चार पट दर परिपत्रकानुसार देताना उर्वरित महाराष्ट्रात ऊस ,संत्री, द्राक्ष, केळी, आदी फळपीकांच्या बागायतदारांना मात्र मेहरबानी होत सवलतीचा दर लावण्याचे काम महावितरण कंपनीने केले असल्याचे समोरी आले आहे .  आ. शेखर निकम यांनी महावितरणचा हा कारभार आणि कोकण रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यावर होणारा अन्याय विरोधात जोरदार आवाज उठवला आहे. जो न्याय रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्याना तोच उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना असला पाहिजे अन्यथा उर्वरित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लावलेला दर लावा, अशी मागणी आ निकम यांनी केली आहे. Increased power tariff for Konkan by Maha distribution

आज नागपूर येथे अधिवेशनाच्या पूर्व संध्येला राज्याचे विरोधी पक्षनेते ना अजितदादा पवार यांची भेट घेऊन महावितरणच्या कारभार सामोरी ठेवला. आणि ना. अजितदादा पवार यांनी थेट महावितरणचे एमडी विजय सिंघाल याना जाब विचारत हा प्रकार काय असा सवाल करीत धारेवर धरले आहे. तर आ. निकम यांनी ही अधिवेशनात हा विषय लावून धरला असून कोकण आणि खास करून जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून वसुली  महावितरण विरोधात आ. निकम आक्रमक झाले आहेत. Increased power tariff for Konkan by Maha distribution

काही वर्षे कोकणातील खास करून जिल्हातील बागायतदार शेतकऱ्यांकडून महावितरण वसुली जात आहे. आ. निकम यांनी आवाज उठवला आहे कोकणातील अन्य लोकप्रतिनिधी आ निकम यांना साथ देऊन जिल्ह्यातील  बागायतदार शेतकऱ्यांची वसुली थांबवतात काय हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. Increased power tariff for Konkan by Maha distribution

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIncreased power tariff for Konkan by Maha distributionLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Shekhar NikamNamdar Ajitdada PawarNews in GuhagarUpdates of Guhagarआ. शेखर निकमगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share568SendTweet355
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.