तहसिलदार वराळे व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न
गुहागर, ता. 21 : महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळे येथे उत्पन्न दाखले काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर मा. तहसिलदार वराळे मॅडम व मा. गटविकास अधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या शिबीराचा 140 पालकांनी लाभ घेतला. Income certificate extraction camp at Chindravale

सन 2023 -24 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्न दाखले काढण्याचे दोन दिवसाचे घेण्यात आले. या दोन दिवसात दि. 18/04/2023 रोजी चिंद्रवळे व वाघांबे व दि. 19/04/2023 रोजी दोडवली व कर्दे अशा प्रकारे नियोजन करण्यात आले होते. ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेच्या सरपंच मालती वणे, उपसरपंच मंगेश निंबरे व सर्व कार्यकारीणी यांनी हा उपक्रम हाती घेतला. याला चारही गावातील पालक वर्गातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. Income certificate extraction camp at Chindravale

या शिबीरासाठी ग्रुप ग्रामपंचायत चिंद्रवळेच्या सरपंच मालती वणे, उपसरपंच मंगेश निंबरे, वाघांबेचे तलाठी प्रविण मालयिम, माजी उपसरपंच तेजस पागडे, ग्रा. पं. सदस्य महेश डिंगणकर, शुभांगी गराटे, प्रियांका ठिक, तेजस्वी कांबळे, रमिता पंडये, ग्रामविकास अधिकारी अशोक घडशी, चिंद्रवळे पोलिस पाटिल अरविंद गुरव, वाघांबे पोलिस पाटिल शर्वरी जोशी, कर्दे पोलिस पाटिल अविनाश गुरव, दोडवली पोलिस पाटिल सारिका निमकर, डाटा ऑपरेटर पल्लवी कावणकर, सचिन पवार, शाळेचे शिक्षक श्री. बोऱ्हाडे, श्री. रांगळे, श्री. बोबडे तसेच तलाठी व त्यांच्या कर्मचारी संगिता जांगळी, गीता राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. Income certificate extraction camp at Chindravale

