• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 December 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आठ जलदुर्गांचा युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश

by Ganesh Dhanawade
January 27, 2023
in Bharat
64 1
0
Inclusion of forts in the heritage list
126
SHARES
361
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 27 : समस्त शिवप्रेमींसाठी अभिमानाची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील आठ जलदुर्गांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र गड-किल्ले संवर्धन समितीने राज्यातील आठ जलदुर्गांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्याची विनंती करणारा प्रस्ताव पाठवण्याच्या विचारात आहे. Inclusion of forts in the heritage list

समितीकडून केंद्र सरकारला लवकरच हा प्रस्ताव पाठवण्यात जाईल. तसंच, राज्याकडून असा प्रस्ताव दुसऱ्यांदा पाठवण्यात येत आहे. या आधीही शिवछत्रपतींच्या कालखंडातील १४ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तो तत्त्वता स्विकारण्यात आला आहे. सदर स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याबाबत युनेस्को विचार करु शकते, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. Inclusion of forts in the heritage list

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७व्या शतकातील जलदुर्ग आणि त्याकिल्ल्यांचा पूर्वीच्या आंतरराष्ट्रीय संबंधांमुळं जलदुर्गांचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये वसई, जंजिरा, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, यशवंतगड, बाणकोट, अर्नाळा, कुलाबा या समुद्रकिल्ल्यांचा समावेश आहे. मध्ययुगीन काळात भारतात व्यापाऱ्याच्या दृष्टीने तुर्क, अरब आणि युरोपीय लोकं प्रथम सागरीमार्गाने कोकणात आले. कोकण किनारपट्टीवरील सर्व किल्ले हे इतर देशांसह विविध संस्कृतीच्या एकत्रीकरणाचे केंद्र आहेत. तसंच, कोकण किनारपट्टी ही गनिमी युद्धाच्या रणनीतीची मांडणी करण्यासाठीही उत्तम होती. त्यामुळं कोकणात अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाऊलखुणा आहेत ज्या युनेस्कोला आकर्षित करु शकतात, असं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. Inclusion of forts in the heritage list

दरम्यान, किल्ले संवर्धन समितीची पहिली बैठक नुकतीच पार पडली, त्यात सदस्यांकडून विविध सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार या शिफारशींबाबत योग्य तो निर्णय घेतील, असंही अधिकाऱ्यांनी म्हटलं. Inclusion of forts in the heritage list

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInclusion of forts in the heritage listLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share50SendTweet32
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.