मुंबई विद्यापीठ आयोजित उडान महोत्सव २०२२-२३
गुहागर, ता. 18 : आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय, देवरूख येथे मुंबई विद्यापीठ आजीवन अध्यापन व विस्तार विभाग कक्ष आयोजित उडान महोत्सव २०२२-२३ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते. पथनाट्य स्पर्धेमध्ये खरे-ढेरे-भोसले महाविद्यालय, गुहागर ( Khare-Dhere-Bhosle College) येथील आजीवन अध्यापन व विस्तार विभागातील विद्यार्थ्यांनी “स्त्रियांचे सक्षमीकरण आणि अस्तित्व” या विषयावर पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. Incentive Prize to KDB College Guhagar

या महोत्सवामध्ये पथनाट्य, पोवाडा गायन, वक्तृत्व, सर्जनशील लेखन व पोस्टर इत्यादी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठातील आजीवन अध्यापन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. कुणाल जाधव, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री. सदानंद भागवत, देवरुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, क्षेत्रीय समन्वयक डॉ. उमेशकुमार बागल आदी उपस्थित होते. सदर महोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील १७ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकवृंद उपस्थित होते. Incentive Prize to KDB College Guhagar
खरे ढेरे भोसले महाविद्यालयाने या पथनाट्यातून सध्या समाजात होत असलेल्या स्त्रियांवरील अत्याचार, त्यांचे अस्तित्व, त्यांना पावलोपावली सहन करावी लागणारी अवहेलना, कुटुंबातून व समाजातून मिळणारी दुय्यम वागणूक, बालविवाह, बालहत्या, ॲसिड अटॅक, प्रसार माध्यमांची अविश्वासहार्यता इत्यादी ज्वलंत विषयांवर या पथनाट्याद्वारे प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. आजच्या काळात या सर्व प्रकारच्या समस्यांना स्त्रियांना कौटुंबिक तसेच कामाच्या ठिकाणी सामोरे जावे लागते. या पथनाट्याद्वारे असे सांगण्यात आले की, जर स्त्रियांना दुय्यम लेखले गेले, तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे असा सामाजिक संदेश दिला. Incentive Prize to KDB College Guhagar
या यशाबद्दल महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य श्री. विराज महाजन व इतर सर्व प्राध्यापकांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले. या पथनाट्या मध्ये मृणाल पाटील, मिहिर बारटक्के, सेजल देवकर, संजना निवाते, आदित्य कदम, श्रद्धा पारधी, मयुरी पाटील, मयूरी माने, साहिल पावसकर, सार्थक निमुणकर, सुरज कुळे, द्वीप कचरेकर, सिमरन नागवेकर, ऋतिका असगोलकर व ऋतीकेश झगडे या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सदर पथनाट्याचे लेखन माजी विद्यार्थी दिपेश गुळेकर यांनी केले. सदर पथनाट्यासाठी डेल विभागाचे समन्वयक प्रा. पी एम आगळे व प्रा. डॉ. आर एस सोळंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. Incentive Prize to KDB College Guhagar
