• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे बारा ज्योतिर्लिंग कार्यक्रमाचे उद्घाटन

by Manoj Bavdhankar
February 15, 2023
in Guhagar
130 1
0
Inauguration of Twelve Jyotirlinga Program at Sringaratali
255
SHARES
729
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : ब्रह्माकुमारीज् शृंगारतळी गुहागरच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग दर्शनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 14 रोजी करण्यात आले. यावेळी आदरणीय तहसीलदार सौ. प्रतिभाताई वराळे मॅडम व क्षेत्रीय संचालिका पुणे, सुनंदा दीदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of Twelve Jyotirlinga Program at Sringaratali

यावेळी सर्वप्रथम महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य अगदी सहज साध्या सोप्या शब्दांमध्ये सुनंदा दीदींनी स्पष्ट केले. तहसीलदार मॅडम यांनी अशा या अनोख्या कार्यक्रमाचे मन भरून कौतुक केले, आणि म्हणाल्या की अशाच कार्यक्रमांमधून आपल्या स्वतःची उन्नती समाजाची उन्नती होत आहे तर आपण सर्वांनी मिळून जरूर अशा गोष्टींसाठी वेळ काढूया असे सर्वांना त्यांनी आवाहनही केले .त्यानंतर शिव ध्वजारोहण करण्यात आले . गुहेमध्ये असणाऱ्या 11 ज्योतिर्लिंगाचे उद्घाटन व पुढे धबधबा आणि 11 फूटी शिवलिंगाचेही दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यानंतर सर्व उभे केलेल्या वेगवेगळ्या विविध स्टॉल्स चे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. Inauguration of Twelve Jyotirlinga Program at Sringaratali

Inauguration of Twelve Jyotirlinga Program at Sringaratali

खास या कार्यक्रमांमध्ये गुहागरचे नगराध्यक्ष माननीय राजेश बेंडल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री मोहन संसारे, निळकंठेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री रमेश वेल्हाळ, लायन्स क्लब गुहागरचे अध्यक्ष शामकांत खातू, बिल्डर श्री बाबाभाई तांडेल, पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुचिता वेल्हाळ असे अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी खास इचलकरंजी, कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर व दापोली मधून अनेक ब्रह्माकुमार बंधू-भगिनींचा सहयोग लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा बहनजी गुहागर यांनी केले. Inauguration of Twelve Jyotirlinga Program at Sringaratali

Inauguration of Twelve Jyotirlinga Program at Sringaratali
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Twelve Jyotirlinga Program at SringarataliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.