पालकमंत्री उदय सामंत, नियोजनासाठीची आढावा बैठक संपन्न
रत्नागिरी दि.18 : विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी “शासन आपल्या दारी” हा लोकाभिमुख उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय नियोजनाची आढावा बैठक आज राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अल्पबचत सभागृह येथे संपन्न झाली. Inauguration of the initiative by Chief Minister in Ratnagiri
जिल्ह्यामध्ये “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दि. 25 मे 2023 रोजी करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनाकरीता विविध विभागांचा आढावा आज घेण्यात आला. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या तालुकानिहाय महसूल, कृषि, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती घेवून सदर लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट याची व्यवस्था याबाबतचा आढावा मंत्रीमहोदय व जिल्हाधिकारी यांनी घेतला. Inauguration of the initiative by Chief Minister in Ratnagiri


वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बंब याबाबतचे नियोजन करण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, नगरपालिका, परिवहन महामंडळ आदी विभांगाना सूचना देण्यात आल्या. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलीस विभागाला मंत्रीमहोदयांनी दिल्या. या कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. Inauguration of the initiative by Chief Minister in Ratnagiri


यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी जलयुक्त शिवार टप्पा 2, गाळमुक्त धरण, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदिनी घाणेकर, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव यांच्यासह जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. Inauguration of the initiative by Chief Minister in Ratnagiri