• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 June 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रानवी येथे मनसेची नाका तेथे शाखा

by Ganesh Dhanawade
August 22, 2023
in Guhagar
104 1
0
Inauguration of the branch by Jitendra Chavan

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांचे रानवी शाखेतर्फे स्वागत करताना.

205
SHARES
585
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर, ता. 22 :  तालुक्यातील रानवी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने गुहागर तालुक्यातील रानवी येथे नाका तिथे शाखा स्थापन करण्यात आली असून या शाखेचे उद्घाटन उत्तर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वेलदूर गावातील अनेक कार्यकत्यांनी मनसे पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण व संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी मनसेची शाल व मनसेचा झेंडा देवुन प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. Inauguration of the branch by Jitendra Chavan

यावेळी बोलताना जितेंद्र चव्हाण यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल. सर्व कार्यकर्त्यांनी राजसाहेबांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे काम करायचे आहे. नाका तेथे शाखा स्थापन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये नाका तिथे शाखा स्थापन होत असून अनेक तरुण वर्ग मनसेमध्ये प्रवेश करत आहेत. Inauguration of the branch by Jitendra Chavan

यावेळी विधानसभा क्षेत्र संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर, विभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, उपविभाग अध्यक्ष सुहास चोगले, तालुका सचिव श्रीराम विचारे, वेलदुर शाखा अध्यक्ष वैभव आंबेरकर, अंजनवेल शाखा अध्यक्ष साहिल खडपे आदींसह रानवी येथील ग्रामस्थ व मनसे सैनिक उपस्थित होते. Inauguration of the branch by Jitendra Chavan

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of the branch by Jitendra ChavanLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMNSNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.