गुहागर, ता. 15 : ग्रामपंचायत कोतळूक येथे १५ वित्त आयोग निधीमधून काम पूर्ण झालेल्या विंधन विहीर नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन सरपंच सौ. प्रगती मोहिते व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते पार पडले. Inauguration of tap water supply scheme at Kotaluk

कोतळूक ग्रामपंचायतीला पाण्याची व्यवस्था करणारी विंधन विहीर नादुरूस्त झाली होती. त्यामुळे १५ वित्त आयोग निधीमधून सन २०२१/२२ मध्ये १ लाख ५७ हजार रू.निधी खर्ची करून काम करण्यात आले. या कामाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य व महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, सरपंच सौ. प्रगती मोहिते यांच्याहस्ते फित कापून तर पंप उद्घाटन उपसरपंच शितल गोरिवले यांच्याहस्ते उत्साहात पार पडले. Inauguration of tap water supply scheme at Kotaluk

यावेळी सरपंच सौ प्रगती मोहिते, उपसरपंच सौ शितल गोरिवले, ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन ओक, सचिन भेकरे, सुनिल आगिवले, लक्ष्मण वरकर, मनाली मोहित, समीक्षा वाघे, आसावरी बाधावटे, मानसी पवार, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, तंटामुक्त समिती सदस्य चंद्रकांत गुरव,डाटा ऑपरेटर समीर ओक, कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर आदी उपस्थित होते. Inauguration of tap water supply scheme at Kotaluk

