गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष श्रेयस नर्सिंग होमद्वारे डॉ. सुरेश भाले आणि सौ. स्वप्नाली भाले रुग्णसेवा देत आहेत. आता याच दांम्पत्याने गुहागर तालुकावासीयांसाठी सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. श्रेयस सोनाग्राफी सेंटरचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शृंगारतळीत होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali

गुहागरमध्ये गेली 25 वर्ष वैद्यकिय सेवा देणारे डॉ. सुरेश भाले व डॉ. सौ. स्वप्नाली भाले यांनी गरोदरपणात आवश्यक असणारी सोनोग्राफी प्रथमगुहागरमध्ये सुरु केली. आता 3 डी, 4 डी, अल्ट्रा सोनोग्राफीची सेवा डॉ. भाले शृंगारतळीत सुरु करत आहेत. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक सोनोग्राफी यंत्र आणले आहे. या अत्याधुनिक यंत्रप्रणालीमुळे गरोदरपणातील आवश्यक सोनाग्राफीबरोबरच कलर ड्रापलर, एन.टी. स्कॅन, आदी अनेक प्रकारच्या सोनाग्राफी गुहागरवासीयांना श्रृंगारतळीत करता येणार आहेत. Inauguration of Sonography Center at Sringaratali
श्रेयस सोनोग्राफी सेंटर हे शृंगारतळीत विष्णूपंत पवार मेमोरीअल हॉस्पिटल शेजारी आहे. या सोनाग्राफी सेंटरचे उद्घाटन 22 मार्च 2023 म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी होत आहे. Inauguration of Sonography Center at Sringaratali

