गुहागर, ता.14 : तालुक्यातील वडद येथे मिशन कंपोस्ट गुहागर 2023 चे औपचारिक उद्घाटन प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले. परचुरी – वडद पालखी भेट सोहळ्या दरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत हे उद्घाटन करण्यात आले. Inauguration of Mission Compost at Vadad

यावेळी मोबाईल श्रेडरद्वारे कोकणातील प्रमुख बायोमास ( झावळ्या, सोडणे, गवत, पातेरा) हे श्रेडरद्वारे बारीक करून दाखवण्यात आले. कोकणातली बागायती आणि शेती गेली कित्येक वर्षे वणव्याच्या झळा सोसत आहेत. तसेच सतत वाढणाऱ्या खतांच्या किमतींमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यावर या मिशन कंपोस्ट द्वारे कायमचा तोडगा निघावा यासाठी माय कंपोस्ट पुणेचे कौस्तुभ गोविंद येद्रे प्रयत्नशील आहोत. यंदाच्या शिमगोत्सवात हे प्रात्यक्षिक कृषी विभागामार्फत नाबार्डच्या सौजन्याने गुहागर तालुक्यातील विविध भागात करण्यात येणार आहे. Inauguration of Mission Compost at Vadad

यावेळी वडद विकास आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. सोमनाथ गावणंग, वडद विकास आघाडीचे अध्यक्ष श्री. भालचंद्र जोगळे, उपसरपंच वडद श्री. संदीप धनावडे, प्रगतशील शेतकरी रमेश भुवड, तालुका कृषी अधिकारी श्री.अमोल क्षीरसागर, कृषी सहाय्यक श्री. प्रमोद गवारी व वडद, परचुरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. Inauguration of Mission Compost at Vadad
