• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तरुणांनी ग्राहक चळवळ खेडोपाडी पोहोचवावी

by Ganesh Dhanawade
January 4, 2024
in Ratnagiri
45 1
0
Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat
89
SHARES
254
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांचे आवाहन

गुहागर, ता. 04 : तरुणांनी आणि विद्यार्थ्यांनी ग्राहक चळवळ अधिकाधिक पद्धतीने गावोगावी पोहोचवावी. जेणेकरून समाज जागृत होईल व त्याची होणारी फसवणूक थांबेल, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांनी केले. Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कोकण प्रांतचा सुवर्ण जयंती वर्ष उद्घाटन सोहळा चिपळूण येथे चितळे मंगल कार्यालयामध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सूर्यकांत पाठक यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सह सचिव सौ. नेहाताई जोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय भागवत, कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, चिपळूण तालुका उपाध्यक्ष श्री. कुलकर्णी आदी उपस्थित होते. Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat

Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat

कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत श्री. झगडे यांनी प्रास्ताविकेमध्ये ग्राहक चळवळ व आपली भूमिका यावर मार्गदर्शन केले. तहसील कार्यालय चिपळूण यांच्या मार्गदर्शनाखाली जागो ग्राहक जागो पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या बहि:शाल व्याख्यान मालेतील न्यू इंग्लिश स्कूल खडपोली, श्री दत्त विद्यालय दळवटणे मोरवणे वालोटी, श्रीराम वरदायिनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निरबाडे या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व पुस्तक देण्यात आले. Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat

Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat

श्री. पाठक पुढे म्हणाले की, भारताच्या वैभवशाली समाज निर्मितीसाठी प्रत्येकाने ग्राहक आंदोलनात सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सहसचिव सौ. नेहाताई जोशी यांनी सुवर्ण जयंती वर्षानिमित्त ग्राहकांच्या हितासाठी जास्त कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. कवी व विविध विषयांवर व्याख्यान देणारे मंदार ओक यांनी ग्राहकांची गरज हीच मानसिकता असते. ग्राहकांचे हित कशामध्ये असतं याची अतिशय खुमासदार पद्धतीने विविध उदाहरणांच्या मार्फत पटवून दिले. संघटनेच्या कार्यामध्ये योगदान देणारे पूर्व दायित्व कार्यकर्ते श्री. अण्णा पटवर्धन, समीर जानवळकर, विनायक निमकर, सिताराम शिंदे आदींचा गौरव करण्यात आला. यावेळी श्री. शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चितळे मंगल कार्यालयाचे मोहन चितळे यांनी उदघाटन सोहळ्याला सर्वोतोपरी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat

या कार्यक्रमाला कोकण प्रांत सचिव मानसिंग यादव, जिल्हा सचिव निलेश गोयथळे, गुहागर तालुकाध्यक्ष श्री. गणेश धनावडे, संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. दीपक पोंक्षे, गुहागर तालुका सचिव प्रदीप पवार, खजिनदार सुशील अवेरे, सदस्य प्रवीण कनगुटकर, समीर जांगळी, अनंत धनावडे, श्री. चव्हाण, संतोष घुमे, जुनेद शेख आदींसह जिल्ह्यातील संघटनेचे बहुसंख्य सभासद उपस्थित होते. चिपळूण तालुका सचिव प्रकाश सावर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर आनंद ओक आणि संघटन मंत्र, ग्राहक गीत व कल्याण मंत्र अतिशय उत्तमपणे सादर केले. Inauguration of Golden Jubilee Year of Customer Panchayat

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Golden Jubilee Year of Customer PanchayatLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share36SendTweet22
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.