• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शृंगारतळी येथे ढेरे बाल रुग्णालयाचे शानदार शुभारंभ

by Ganesh Dhanawade
March 6, 2023
in Health
161 2
0
Inauguration of Dhere Hospital at Sringaratali
317
SHARES
906
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 06 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉ. साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावरील सुसज्ज अशा ढेरे बाल रुग्णालयाचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर सुभाष जवळगीकर, डॉ. मुकुंद डबीर उपस्थित होते. Inauguration of Dhere Hospital at Sringaratali

Inauguration of Dhere Hospital at Sringaratali

डॉ शशांक ढेरे यांनी एमबीबीएस ( MBBS) चे शिक्षण हे तेरणा मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील सुप्रसिद्ध अश्या सायन हॉस्पिटल ( लोकमान्य टिळक मुनिसिपल मेडिकल कॉलेज) येथून बालरोग व नवजात शिशु यांचे पदव्युत्तर पदवी (DCH ) चे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी मुंबई मधील केईम आणि वाडिया चिल्ड्रेन हॉस्पीटल येथे देखील बालरोग व नवजात शिशु विभागामध्ये काम केले आहे. डॉ. ढेरे यांनी मुंबई, पुणे या शहरात न जाता आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील बालकांना मिळावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे बालरोगतज्ञ म्हणून एक वर्ष सेवा स्वीकारली. दरम्यान, गुहागर तालुक्यात एकहि बालरोगतज्ञ व नवजातशिशु तज्ञ नसल्यामुळे गुहागर तालुक्यातील बालकांना चिपळूण , डेरवण, रत्नागिरी अश्या शहराच्या ठिकाणी जावे लागत असे. नागरिकांची होणारी अडचण, मानसिक व आर्थिक त्रास यापासून सुटका व्हावी, या सेवाभाव वृत्तीने गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी बाजारपेठ या ठिकाणी सुसज्ज असे ढेरे बालरुग्णालय ( लहान मुलांचे हॉस्पिटल) सुरू केले आहे. Inauguration of Dhere Hospital at Sringaratali

या रुग्णालयमध्ये जन्मजात बालकापासून ते १८ वर्षे वयापर्यंत सर्व बालकांवर सर्व प्रकारच्या आजारावर उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. नवजातशिशु मधील विविध आजार , कमी वजनाची तसेच कमी दिवसांची अर्भके यांना लागणारे काचपेटी ( रेडियेंट वार्मर / इन्कुबेटर ) याची सोय या रुग्णालयात उपलब्ध केली आहे. तसेच नवजात बालकांचे विविध आजार, आजार यावर उपचार आणि मार्गदर्शन, लहान मुलांचे साथीचे आजार, आकडी, झटके, जन्मजात हृदयरोग, लहान मुलाचे श्वसनाचे आजार, बालदमा ( अस्थमा )यासाठी वाफ देण्याची (नेबुलायझेर थेरपी ) सोय तसेच बालकांचे कुपोषण वजन न वाढणे, गतिमंद, मतिमंद बालके यावर उपचार आणि मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच नवजात बालकांसाठी रेडिएंट वॉर्मर / इन्कुबेटर आणि कावीळ कमी करण्याची मशीन ( LED फोटोथेरपी) ह्या सुविधा तालुक्यात सर्वप्रथम डॉ. शशांक ढेरे यांनी ढेरे बालरुग्णालयात उपलब्ध करून दिल्या आहेत. Inauguration of Dhere Hospital at Sringaratali

या उद्घाटन कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. निखिल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनश्याम जांगिड, गुहागर मेडिकल असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉ. संदीप जाधव व सदस्य, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. सुरेश भाले, काँग्रेसचे अध्यक्ष रियाज ठाकूर, कॅनरा बँकेचे श्री. जाधव आदिंसह अन्य मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. बाळासाहेब ढेरे, डॉ. निलेश ढेरे, डॉ. गीतांजली ढेरे, डॉ. ऋषिकेश ढेरे, प्रा. निवृत्ती ढेरे, सौ. शोभा ढेरे, सौ. मीना ढेरे, सुजाता गुरव, प्रवीण सावंत आदी उपस्थित होते. Inauguration of Dhere Hospital at Sringaratali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Dhere Hospital at SringarataliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share127SendTweet79
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.