• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डॉ. शशांक ढेरे यांच्या ढेरे बाल रुग्णालयाचे उद्या शुभारंभ

by Ganesh Dhanawade
March 3, 2023
in Guhagar
177 2
0
Inauguration of Dhere Children's Hospital at Sringaratali
348
SHARES
995
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शृंगारतळी येथे तहसीलदार सौ.प्रतिभा वराळे यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर, ता. 03 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉक्टर साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावर सुरू होत असलेल्या सुसज्ज अशा ढेरे बाल रुग्णालयाचे उद्घाटन सोहळा उद्या दि. ४ मार्च रोजी दुपारी १२.२८ वाजता तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर सुभाष जवळगीकर व डॉक्टर मुकुंद डबीर उपस्थित राहणार आहेत. Inauguration of Dhere Children’s Hospital at Sringaratali

संपूर्ण गुहागर तालुक्यात पहिलेच हे बाल रुग्णालय होत आहे. तालुक्यातील बालक आजारी पडल्यास त्याला प्रत्येकवेळी ५० किमी अंतर असलेल्या चिपळूण याठिकाणी घेऊन जावे लागत असे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असे. तसेच संपूर्ण दिवस या प्रवासात जात असे. ही सर्व गैरसोय दूर करण्यासाठी डॉ. शशांक ढेरे यांनी शृंगारतळी याठिकाणी सुसज्ज असे बाल रुग्णालय सुरू करत आहेत. Inauguration of Dhere Children’s Hospital at Sringaratali

या बाल रुग्णालयामध्ये सुसज्ज बाह्य रुग्ण विभाग, 24 तास आंतर रुग्ण विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, रेडीएट वार्मर व इंक्युबेटर, नवजात बालकांची कावीळ कमी करणे मशीन, लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या रुटीन व स्पेशल लसीकरणाची सोय, सर्व आजारांवर उपचार व मार्गदर्शन, मल्टीप्यारा मॉनिटर, सक्शन मशीन, पल्स ऑक्सिमीटरची सोय, इमीलेप्सी क्लिनिक, लहान मुलांच्या झटके व आकडी यावर उपचार व मार्गदर्शन, अस्थमा क्लिनिक, लहान मुलांच्या श्वसनाचे आजार, वाफ देणे, बालदमा यावर उपचार व मार्गदर्शन, न्यूरो डेव्हलपमेंट क्लीनिक, गतिमंद, मतिमंद, चंचलपणा यावर उपचार मार्गदर्शन आदी सेवा 24 तास पुरवली जाणार आहे. Inauguration of Dhere Children’s Hospital at Sringaratali

तरी उद्या होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉ. साशंक ढेरे, निवृत्ती ढेरे, डॉ. बाळासाहेब ढेरे, डॉ. निलेश ढेरे, डॉ. गीतांजली ढेरे, डॉ. ऋषिकेश ढेरे, सौ. तन्वी ढेरे, सौ. शोभा डेरे यांनी केले आहे. Inauguration of Dhere Children’s Hospital at Sringaratali

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInauguration of Dhere Children's Hospital at SringarataliLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share139SendTweet87
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.