चिखली साळवीवाडी; दळवी कुटुंबियांचे योगदान
गुहागर, ता.06 : गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील नव्या बस थांब्याचे उद्घाटन येथील दळवी कुटुंबियांच्या हस्ते दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. 1989 मध्ये हा बसथांबा कै. सीताराम दळवी व कै. सौ. जयवंती दळवी यांच्या स्मरणार्थ तुकाराम दळवी यांनी बांधला होता. तुकाराम दळवी यांचा मुलगा विजय दळवी व कुटुंबियांनी महामार्गाच्या कामात तोडलेला बसथांबा पुन्हा बांधला. Inauguration of Chikhali Bus Stop

गुहागर तालुक्यातील चिखली साळवीवाडी येथील तुकाराम दळवी व कुटुंबियांनी 1989 मध्ये आपल्याच जागेत मोफत बस थांबा बांधला होता. मात्र तो गुहागर – विजापूर महामार्ग रस्ता रुंदीकरणात काढून टाकण्यात आला होता. त्यामुळे गेले वर्षभर येथील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांना उघड्यावरच उभे राहून बसची वाट पहावी लागत असे. ही गैरसोय लक्षात घेऊन येथील तरुण मंडळी संजय साळवी, अभिजित साळवी, अमित साळवी आणि विशाल साळवी यांनी बस थांबा बांधण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान कै. सीताराम दळवी व कै. सौ. जयवंती दळवी यांचा नातू विजय तुकाराम दळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे 1 लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करुन दिला. त्यातूनच हा बस थांबा उभा राहिला. Inauguration of Chikhali Bus Stop

या बस थांब्याच्या उद्घाटनावेळी जेष्ठ ग्रामस्थ प्रभाकर साळवी, विजय दळवी, सिद्धेश साळवी, विराज साळवी, साहिल साळवी, संदीप साळवी, संजय साळवी, अभिजित साळवी, अमित साळवी आणि विशाल साळवी आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. या बस थांब्याच्या समोरील विरुध्द दिशेला ग्रामस्थांच्या सहकार्यातून आणखी एक बस थांबा बांधण्यात येणार असल्याची माहिती संजय साळवी यांनी दिली. Inauguration of Chikhali Bus Stop

