आमदार भास्कर जाधव यांनी दिला होता 5 लाखांचा निधी
गुहागर, ता. 14 : आमदार भास्कर जाधव यांनी गेल्यावर्षी साखरीआगर अंजनवाडीतील सभागृहासाठी 5 लाखाचा निधी दिला होता. या निधीतून वर्षभरात येथे सभागृह बांधण्यात आले. या सभागृहाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. नेत्रा ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (ता. 13) करण्यात आले. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्यामुळे आमदार भास्कर जाधव यांनी सौ. नेत्रा ठाकूर यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने उद्घाटन करण्यास सांगितले होते. Inauguration of auditorium at Sakhari Agar

आमदार भास्कर जाधव यांनी निधी देण्याचे आश्र्वासन पूर्ण केले. गेल्या अनेक वर्षांची मागणी असलेले सभागृह अंजनवाडीत झाले. त्यामुळे अंजनवाडीतील ग्रामस्थ आमदार जाधव यांच्या पाठीशी ठामपणे उभी रहातील. असे आश्र्वासन या सोहळ्यात अंजनवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सौ. नेत्रा ठाकूर यांना दिले. Inauguration of auditorium at Sakhari Agar

या उद्घाटन सोहळ्याला ग्रामपंचायत साखरीआगरच्या सरपंच सौ. दुर्वा पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. पुनम पाष्टे, माजी उपसभापती सिताराम ठोंबरे, वेळणेश्वर जि. प. गटाचे उपतालुकाप्रमुख विलास वाघे, सौ. जोत्स्ना काताळकर, वेळणेश्वरचे सरपंच चैतन्य धोपावकर, उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, हेदवीच्या सरपंच सौ. आर्या मोरे, ग्रामसेवक अनंत गावणंग, संदिप गोरिवले, सौ. प्रियांका ठीक, विठोबा फणसकर हे प्रमुख पाहुणे तसेच अनंत माईन, विलास कदम, विकास कदम, रामचंद्र तेरेकर, श्रीमती सत्यवती घाणेकर, सौ. अश्विनी नाचरे, विकास कदम, विजय भुते, सुभाष अडूरकर, श्रीकांत येतोस्कर, संजीवनी मांडवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. Inauguration of auditorium at Sakhari Agar या कार्यकमाचे सुत्रसंचालन मंडळाचे सचिव राजेंद्र कदम यांनी केले. सर्व उपस्थितांचे आभार मानून सुरेश कदम यांनी समारोप केला. Inauguration of auditorium at Sakhari Agar

