शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर
गुहागर, ता. 16 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाकरिता घरी पोषक वातावरण किंवा इतर सुविधा उपलब्ध नसल्याने अशा प्रशिक्षणार्थ्यांना अभ्यासाचे पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासिका वर्ग सुरू करण्यात आला. Inauguration of Abhyasika and Virtual Classroom


ही संकल्पना मा. मंत्री, श्री. मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभाग अंतर्गत व्यवसायशिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासिका वर्गाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. मा. मुख्यमंत्री, श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते ते पार पडले. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गुहागर येथील अभ्यासिका व व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन मा. श्री नितीन खानविलकर, साईट इन्चार्ज, युटिलिटी पावरटेक लिमिटेड यांच्या हस्ते पार पडले. Inauguration of Abhyasika and Virtual Classroom


त्यावेळी श्री. खानविलकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना खेळाच्या साहित्याचे वाटप केले व युटिलिटी पॉवरटेक लिमिटेड या कंपनी मार्फत संस्थेच्या मागणीनुसार प्रशिक्षणार्थ्यांना रानवी फाटा येथे प्रवासी निवारा शेडचे बांधकाम करून दिले. त्यासाठी त्यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. Inauguration of Abhyasika and Virtual Classroom

