गुहागर, ता. 01 : एनएमएमएस परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखूमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातून दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या शाळेतील NMMS परीक्षेमध्ये दहा विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. In Palshet High School students merit list

पालशेत हायस्कूल मधील यश किशोर आग्रे याने जिल्ह्यात 14 वा तर विव्हेना अरविंद पटेकर हिने जिल्ह्यात 21वी आली आहे. याबद्दल गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या दोन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे. त्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे. या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे, प्रेरणास्थान रयत शिक्षण संस्था जनरल कॉन्सिल सदस्य प्रशांत पालशेतकर, मुख्याध्यापक श्री. मनोज जोगळेकर, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. In Palshet High School students merit list

