नवानगरमध्ये तरुणावर चाकूने वार, आरोपी पोलीसांच्या ताब्यात
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील नवानगर येथे क्रिक्रेट खेळताना ऋषिकेश नाटेकर आणि सत्यजीत पटेकर यांच्यात शुक्रवारी (ता. 24) क्षुल्लक वाद झाला. या वादाच्या रागातून सत्यजीतने ऋषिकेशवर जीवघेणा हल्ला केला. अभय पालशेतकर आणि अवधुत कोळथरकर हे दोन मित्र मध्ये पडल्याने ऋषिकेश थोडक्यात बचावला. सध्या तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान गुहागर पोलीसांनी सत्यजित पटेकरला दाभोळमधुन पकडले आहे. In Guhagar Cricket Argument Leads to Brutal Assault
In Guhagar Cricket Argument Leads to Brutal Assault
याबाबत पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार गुहागर तालुक्यातील नवानगरमध्ये 24 एप्रिलला सायंकाळी 5 च्या दरम्यान काही तरुण क्रिक्रेट खेळत होते. या खेळादरम्यान ऋषिकेश नाटेकर आणि सत्यजीत पटेकर यांच्यात क्षुल्लक वाद झाला. सत्यजितने त्या वेळी शिवीगाळी करताना थांब तुला दाखवतो अशी धमकी दिली होती. मात्र खेळ संपला विषय संपला असे समजून सर्वजण घरी गेले. त्यानंतर 7.30 च्या सुमारास ऋषिकेश नाटेकर, अभय पालशेतकर आणि अवधुत कोळथरकर हे तिघे नवानगर येथे नव्याने बांधलेल्या पुलावर गप्पा मारण्यासाठी जमले. त्याचवेळी रागाच्या भरातील सत्यजित पटेकर तेथे आला आणि त्याने ऋषिकेशच्या पाठीत चाकु खुपसला. त्यानंतर त्याच्या पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. यावेळी खूप शहाणा झाला आहे का, तुला खूप क्रिकेट कळते का, आज तुझा जीवच घेतो म्हणजे तू जास्त बोलणार नाहीस असे बोलून ऋषिकेशला ढकलून दिले. अभय पालशेतकर आणि अवधुत कोळथरकर यांनी ऋषीकेशला धरले, सावरले. या दोघांना उद्देशून सत्यजित म्हणाला की, तुम्हाला माहीती नाही का मी मर्डर मधुन सुटुन आलोय आणखी मर्डर करायला मला फरक पडणार नाही. असे सांगत या दोघांच्या अंगावर धावून गेलेला सत्यजित ऋषिकेशचा मोबाईल घेवून तिथून निघून गेला. In Guhagar Cricket Argument Leads to Brutal Assault. मित्र अभय पालशेतकर आणि अवधुत कोळथरकर यांनी तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने ऋषिकेशला गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता आणले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर ऋषिकेशला अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. अजुनही तो जिल्ह रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या संपूर्ण घटनेचा गुन्हा 24 तारखेला गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. गुहागर पोलीसांनी वेगाने तपास करत आरोपीला फरार होण्यापूर्वीच दाभोळमधुन पकडण्यात आले. (In addition)यापूर्वी सत्यजित पटेकर यांवर गुहागर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 302, 397, 201, 120 (ब) व 34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. However आजच्या घटनेचा गुन्हा दाखल करताना पोलीसांनी भा.न्या.सं. 109, 115(2), 118(1), 352, 351 (3), 131 ही कलमे लावली आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उप.निरीक्षक सोनावणे करत आहेत. In Guhagar Cricket Argument Leads to Brutal Assault