गुहागर, ता. 09 : भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी ८२ हजार भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केला आहे. मागील कोणत्याही वर्षाच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकी विद्यार्थी व्हिसा मिळण्याचे प्रमाण कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. In America for Student Education

अमेरिकेत विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी व्हिसासाठी नवी दिल्ली येथील अमेरिकी दूतावास व मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकता येथील वाणिज्य दूतावासात मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. त्यांना नियोजित तारखेला महाविद्यालय, विद्यापीठांमध्ये उपस्थित राहता यावे, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मे ते ऑगस्ट या कालावधीत आलेल्या विद्यार्थी व्हिसा अर्जांच्या प्रक्रियेला प्राधान्य दिले जात असल्याचे दूतावासाने एका निवेदनाद्वारे सांगितले. In America for Student Education

यंदाच्या उन्हाळी हंगामात आम्ही ८२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी व्हिसा जारी केले आहेत. मागील कोणत्याही वर्षापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. हा बहुतांश भारतीय कुटुंबांसाठी उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक मागणी असलेला देश आहे, हे यावरून दिसून येते, असे अमेरिकेच्या भारतातील अति वरिष्ठ राजनैतिक अधिकारी पॅट्रिशिया लॅसिना यांनी सांगितले. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हिसा मिळाल्याचा आनंद होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी शिक्षणात अडथळे आले होते. आता व्हिसा मिळाल्याने विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठांमध्ये वेळेवर पोचू शकतील भारत व अमेरिकेची आंतरराष्ट्रीय भागीदारी टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानही यातून अधोरेखित होते, असे त्या म्हणाल्या. In America for Student Education
