सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण झाली सुनावणी
दिल्ली, ता. 23 : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी झाली. यादरम्यान, न्यायालयाने हे प्रकरण आता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केले आहे. यामुळे आता 25 ऑगस्ट रोजी घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. हा शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का मानण्यात येत आहे. Important hearing in Supreme Court


महाराष्ट्र सत्ता संघर्षावर सुनावणी सातत्याने पुढे ढकलले जात असल्याने शिवसेनेने आज लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. ही मागणी मान्य करत न्यायालयाने प्रकरण पटलावर घेतले. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर सुनावणी सुरु होताच काही वेळातच हे प्रकरण पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आले आहे. दोन दिवसानंतर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या पाच सदस्यांमध्ये कोण न्यायाधीश असणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. Important hearing in Supreme Court
सरन्यायाधीश रमन्ना यांच्या तीन सदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती कृष्णमुरारी व्हीसी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. तर, ठाकरे गटाकडून बडे नेते उपस्थित होते. परंतु, शिंदे गटाकडून न्यायालयात कोणीही उपस्थित नव्हते. Important hearing in Supreme Court


दरम्यान, सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना 27 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत. यानंतर उदय लळीत हे न्यायधीश असणार आहे. परंतु, रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालीच सुनावणी करण्यास शिवसेना आग्रही होती. यानुसार 25 ऑगस्ट रोजीच सुनावणी होणार असल्याने शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. Important hearing in Supreme Court