• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 September 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे गौरी गणपती मूर्तींचे विसर्जन

by Ganesh Dhanawade
September 21, 2026
in Guhagar
57 0
0
Immersion of Gauri Ganpati idols at Guhagar
111
SHARES
318
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका, समुद्र व नदी नाल्यामध्ये विसर्जन

गुहागर, ता. 21 :  गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी – गणरायांच्या मूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्रकिनारी व नदी नाल्यामध्ये गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत शांततेत विसर्जन सुरु होते. विसर्जन ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात होते. Immersion of Gauri Ganpati idols at Guhagar

Immersion of Gauri Ganpati idols at Guhagar

गुहागर तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गेले पाच दिवस तालुक्यातील प्रत्येक घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यात गेली काही दिवस भजन, जाकडी नृत्य, महिलांचे नाच व अन्य कार्यक्रमाने वातावरण भक्तीमय झाले होते. पाच दिवसांच्या गणपतींचे व गौराईचे आज सहाव्या दिवशी गुहागर खालचापाट, शहरासह, असगोली, वरचापाट बाग, आरे, वेलदूर, अंजनवेल, धोपावे, पालशेत, वेळणेश्वर, साखरी आगर, नरवण, तवसाळ या समुद्र किनाऱ्यावर तर कोतळूक, कुटगिरी, पाभरे, गिमवी, आबलोली, तळवली, वडद, देवघर, झोंबडी याठिकाणी नागरिकांनी नद्या नाल्यामध्ये बाप्पाचे टाळ मृदुंगाच्या गजरात, काहींनी गणपती बाप्पा मोरया…जयघोष करत विसर्जन केले. तालुक्यात काहींनी साउंड सिस्टीम लावून लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढली. Immersion of Gauri Ganpati idols at Guhagar

Immersion of Gauri Ganpati idols at Guhagar

गुहागर समुद्र किनारी नगरपंचायतीने  विसर्जनासाठी कोणतीही दुर्घटना घडू नये, याची काळजी घेतली होती. पाच ठिकाणी पाण्यामध्येच सुरक्षा रक्षक उभे केले होते. तसेच किनाऱ्यावर निर्मळ्यामुळे अस्वछता होऊ नये म्हणून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व ठिकाणी लक्ष ठेवत विसर्जन ठिकाणी मोठी गर्दी होणार नाही, याची काळजी घेत होते.  Immersion of Gauri Ganpati idols at Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsImmersion of Gauri Ganpati idols at GuhagarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet28
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.