• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 September 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अवैध मार्गाने आणलेले हेरॉइन केले जप्‍त

by Guhagar News
March 9, 2023
in Bharat
139 1
0
अवैध मार्गाने आणलेले हेरॉइन केले जप्‍त
273
SHARES
780
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

53 कोटी रू. मूल्‍याचे हेरॉइन सीमाशुल्क विभागाच्या मुंबई शाखेने जप्‍त केले

मुंबई, ता. 08 : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय  विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवून 7.6 किलो ‘ऑफ-व्हाइट पावडर’  जप्त करण्यात आली. या भुकटीची चाचणी केल्यानंतर त्यात हेरॉइन असल्याचे आढळले. या हेरॉईनची किंमत सुमारे 53 कोटी रूपये आहे. Illegally imported heroin seized

Illegally imported heroin seized

आदिस अबाबा येथून  मुंबईला येणाऱ्या एका प्रवाशाकडून अमली पदार्थाची भारतात तस्करी होणार असल्याची  गुप्त माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती, त्याआधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्‍ट्रीय  विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवली होती. डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने 7 मार्च रोजी सकाळी एका  संशयित प्रवाशाला अडवले आणि प्रवाशाच्या सामानाची कसून झडती घेतली. यामध्‍ये  संशयिताने ट्रॉली बॅगच्या आत पोकळी बनवून  लपवून ठेवलेली 7.6 किलो ‘ऑफ-व्हाइट पावडर’  जप्त करण्यात आली. Illegally imported heroin seized

या भुकटीची चाचणी केल्यानंतर त्यात हेरॉइन असल्याचे आढळले. अवैध आंतरराष्‍ट्रीय बाजारामध्‍ये या हेरॉईनची किंमत सुमारे 53 कोटी रूपये आहे. या प्रवाशाला अटक करून  मुख्‍य महानगर दंडाधिकारी न्यायालयामध्‍ये  हजर केले असता आरोपीला 10 मार्चपर्यंत डीआरआय कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. Illegally imported heroin seized

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIllegally imported heroin seizedLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share109SendTweet68
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.