माजी आमदार डॉ. विनय नातूंची मागणी
गुहागर, ता. 23 : गेले अनेक महिने गुहागर तालुक्यातील काताळे येथून सागरी महामार्गांवर बॉक्साईटच्या अवजड वाहनांची वाहतूक सुरु आहे. पोलीस यंत्रणा व परिवहन अधिकारी यांचे लक्ष नसल्याने किंवा यांच्या संगनमताने व काही जणांच्या आशीर्वादाने बॉक्साईटच्या नावाखाली अवैध पास बनवून वाहतूक सुरू आहे. या वाहनांचे क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वजन भरले जाते. त्यामुळे या अवैध वहातुकीवर कारवाई करावी. अशी मागणी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे. Illegal transportation of bauxite


रविवारी रात्री पोमेंडी फाटा जवळ ट्रकला लागलेल्या आगीची भीषणता लक्षात घेतली पाहिजे. सदर ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल होता. त्यामुळेच रस्त्यावर घर्षणाने मागच्या टायरनी प्रथम पेट घेतला. नंतर ही आग पुढे आली. ट्रकचा डिझेल टँकही पेटला. सुदैवाने ग्रामस्थ मदतीला धावल्याने मोठा अपघात टळला. कोकणात आता गणेशोत्सव सुरू होत आहेत. अशावेळी या अवैध वहातुकीमुळे अपघात होऊ शकतात. तरी संबंधितांवर कारवाई करून त्यांचे वरती अनधिकृत वाहतुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू साहेब यांनी केली आहे. Illegal transportation of bauxite

