पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांची गुहागर तहसीलदारांकडे मागणी
गुहागर, ता. 02 : दाभोळ खाडीमध्ये विसापूर येथे वाळू उपसा करणाऱ्या ड्रेझर्सना खाडीकिना-याला लावण्यासाठी बेकायदेशीर भराव करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी गुहागर पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांनी गुहागर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. Illegal sand mining in Visapur

या निवेदनात म्हटले आहे की, विसापूर येथील वाळूव्यवसायिकांनी शासनाचे नियम, अटी डावलून मनमानी करत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, पत्तन विभाग, महसूल विभाग यापैकी कुणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या खाडीपात्रामध्ये भराव करून वाळूउपसा सुरु ठेवलेला आहे. कोणत्याही संबंधित विभागांची परवानगी न घेता येथील खाडीपात्रामध्ये बेकायदेशीर भराव केला आहे. याची तात्काळ तपासणी करून संबंधितांवर कठोर कार्यवाही व्हावी, अशी मागणी जोशी यांनी केली आहे. Illegal sand mining in Visapur

