गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पालशेत येथील मुख्य रस्त्याच्या पुलाच्या कामासाठी पुलाच्या बाजूने नव्याने तयार करावा लागणाऱ्या ॲप्रोज रस्त्यासाठी ठेकेदाराकडून पालशेत खाडीमधील रेती व दगडाची अवैद्यपणे उत्खनन केले गेले असल्याची बाब समोर आली आहे. यावर महसुल विभाग कोणती भूमिका घेणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे. Illegal Excavation at Palshet
गुहागर तालुक्यातील मोडकाघर ते तवसाळ या मार्गावरील पालशेत येथील जुना पुल कोसळून त्याठिकाणी नवीन पुल बांधण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. या पुलासाठी बजेटमधुन ६ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. चिपळूण येथील एस. एम. चिपळूणकर या ठेकेदाराने सदर काम घेतले असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम विभागातून प्राप्त झाली आहे. सदर पुलाच्या सुरूवातीला या शेजारून नवीन अॅप्रोज रस्ता बनवीण्याचेही या कामामध्ये आहे. माती व डबराच्या सहाय्याने सदर रस्ता बनवून त्यावर खडीकरण व डांबराचा एक लेअर असे या अॅप्रोज रस्त्याचे काम आहे. अशीही माहीती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झाली आहे. मात्र सदर ॲप्रोज रस्त्यासाठी ठेकेदार एस. एम. चिपळूणकर यांनी याच खाडीमधील रेती व दगडाची कोणतीही परवानगी न घेता खुलेआम उत्खनन केले आहे. Illegal Excavation at Palshet
आज येथील रेती उत्खननासाठी शासनाकडून लिलाव केला जातो. स्थानिकांकडुन येथील अवैद्य रेती व वाळु चोरीसदर्भात मोठ्या प्रमाणात विरोध होत असून महसुल विभागाने येथील वाळु व रेती चोरीवर काहीजणांवर कारवाईही केली आहे. मात्र, येथील ठेकेदाराने महसुल विभागाला फोटयावर मारत खुलेआम उत्खनन करून माती ऐवजी या अॅप्रोज रस्त्यासाठी रेती व खाडीतीलच दगडांचा वापर केला आहे. या अॅप्रोज रस्त्याला दोन्हीबाजुने पिचींग होणे आवश्यक आहे. मात्र मोफत अवैद्यपणे उत्खनन केलेल्या रेतीचा वापर करून कामामध्ये मोठ्याप्रमाणावर नफा कमवीण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान यासंदर्भात गुहागर महसुल विभाग, पालशेतचे तलाठी श्री. ताटेवाड, सर्कल अधिकारी श्री. कानीटकर यांच्याकडे या उत्खननाबाबत विचारणा केली असता येथील उत्खननासाठी कोणतीही परवानी घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे महसुल विभाग या उत्खननावर अवैद्य उत्खनन म्हणून उत्खनन करण्यासाठी वापरलेली मशीन व संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करत पाच पट दंडासह कारवाई करेल का, असा सवाल सर्वसामान्य नागरीक करत आहे. Illegal Excavation at Palshet