Guhagar News, 23 : बाहरेनमधील कोकण कमिटीतर्फे 7 एप्रिलला ईफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या ईफ्तार पार्टीला बाहरेनसह आजुबाजुच्या परिसरात रहाणाऱ्या कोकणी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोकण कमिटी, बाहरेनचे अध्यक्ष सर्फराज मुल्ला यांनी केले आहे. Iftar Party in Baharen by Konkan Committee

Saudi, Qatar, Bahrian, Dubai, Kuwait, Oman या देशांमध्ये आजपासून (ता. 23) रमझानचा (Ramzan) पवित्र महिना सुरु होत आहे. यानिमित्ताने बाहरेनमधील भारतीयांसाठी ईफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. ही ईफ्तार पार्टी अल्लहिसल्लाह सोसायटी, मोहरक येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होणार आहे. पार्टीच्या सुरवातीला कुराण पाकची तिलावत म्हणण्यात येणार आहे. कोकण कमिटी बाहरेनचे अध्यक्ष सर्फराज मुल्ला यावेळी कोकण कमिटीचे उद्देश व माहिती सांगणार आहेत. Iftar Party in Baharen by Konkan Committee

या ईफ्तार पार्टीला कोकणी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कोकण कमिटी बाहरेला सहकार्य करावे. असे आवाहन सर्फराज मुल्ला यांनी केले आहे. ईफ्तार पार्टील संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास इम्रान हसवारे (36898913), मुजम्मील परकार (38923671) आणि नबील मुल्लाजी (39614549) यांच्याशी संपर्क करावा. Iftar Party in Baharen by Konkan Committee

कोकणातील पालघर, वसई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग येथील हजारो कोकणी बांधव नोकरी व्यवसायानिमित्त बाहरेनमध्ये रहातात. या सर्वांना एकत्रीत आणणण्याचे काम कोकण कमिटीतर्फे केले जाते. या कोकणी बांधवांच्या अडचणी सोडवणे, क्रिक्रेटच्या स्पर्धा भरविणे, आरोग्य तपासणी करणे, औषधोपचारासाठी मदत करणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत करणे, अशी अनेक कामे कोकण कमिटीतर्फे केली जातात. अशी माहिती कोकण कमिटीचे सदस्य वहाब मणियार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. Iftar Party in Baharen by Konkan Committee