• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर…

by Guhagar News
June 20, 2023
in Ratnagiri
159 2
0
If there is no rain, there will be a load shedding crisis
312
SHARES
892
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाऊस न पडल्यास भारनियमनाचे संकट ओढवणार

गुहागर, ता. 20 :  महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद  पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी येथील चौथा टप्प्यातील वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली असून येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास पहिला, दुसरा आणि तिसऱ्या टप्प्याची वीजनिर्मितीही बंद होण्याच्या मार्गावर आहे. If there is no rain, there will be a load shedding crisis

अशा परिस्थितीत चिपळूण परिसरात पाणी टंचाई उद्भवण्याचा मोठा धोका आहे. कोयनेच्या अवजलावर चिपळूण व वाशिष्ठी नदीलगतची गावे तसेच लोटे, गाणे-खडपोली, आरजीपीपीएल, खेर्डी येथील औद्योगिक वसाहती अवलंबून आहेत. जर वीजनिर्मिती पूर्णपणे ठप्प झाली तर मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जाण्याचा धोका आहे. If there is no rain, there will be a load shedding crisis

धंद्या उद्योगासाठी सध्या विजेची नितांत गरज असल्याने कोयना वीज प्रकल्प चालविला जातो. पाण्यावर होणारी वीज ही सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे अतिउच्च मागणीच्यावेळी कोयना वीज प्रकल्प चालवून विजेची गरज भागवली जाते. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी असून १ जूनपासून जलवर्ष सुरू होते.  त्यानंतर धरणात जमा होणारे पावसाचे पाणी मोजले जाते. मात्र, या वर्षी जूनचा निम्मा महिना संपत आला तरी पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी खालावली जलवर्षात मात्र कोयना वीज प्रकल्पावर पाणी संकट आहे. If there is no rain, there will be a load shedding crisis

सध्या धरणामध्ये ११.७४ टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे.  चौथा टप्पा पूर्णपणे ठप्पं झाला असून कोयना नदीला १०५० क्युसेस पाणी सिंचनासाठी धरणातून सोडले जात आहे. कोयना धरण क्षेत्रात पाणी साठा वाढला नाही तर पहिला, दुसरा व तिसरा टप्पादेखील  ठप्पं होण्याच्या मार्गावर आहे.  पाऊस न झाल्यास भारनियमनाचे संकट ओढवणार आहे. If there is no rain, there will be a load shedding crisis

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiIf there is no rain there will be a load shedding crisisLatest Marathi NewsLatest NewsLatest News on Guhagarload sheddingMarathi NewsNews in GuhagarRainUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.